जावलीतील स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी एकनिष्ठ संघर्ष नेत्यांचा केला सन्मान.
मला एक संधी द्या, मी त्या संधीचं सोनं करेन.मा.आ.शशिकांत शिंदे

जावलीतील स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी एकनिष्ठ संघर्ष नेत्यांचा केला सन्मान.
मला एक संधी द्या, मी त्या संधीचं सोनं करेन.मा.आ.शशिकांत शिंदे
मेंढा.दि.४: जावळी तालुक्याचा सुपुत्र असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. गेली सोळा वर्ष सामान्य जनतेने प्रेम दिले आणि सत्कार सुद्धा केला त्यामुळे मी भारावून गेलो असून मला पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रदेशाध्यक्ष म्हणून संधी दिली त्या संधीचं सोनं करिन असे भावनिक आव्हानात्मक भाषणात शशिकांत शिंदे म्हणाले.
मेढा येथील कलश मंगल कार्यालयात झालेल्या या ऐतिहासिक सत्कार सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्य सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल आमदार रोहित पवार यांचा सत्कार करण्यात आला.
मेढा नगरीतून ढोल ताशाच्या गजरात व तुतारीच्या निनादांमध्ये आमदार शशिकांत शिंदे व आमदार रोहित पवार यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जावळी तालुक्यात प्रवेश करतात असताना अनेक गावातील ग्रामस्थांनी दोन्ही आमदारांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जागोजागी सत्कार करण्यात आला आणि सर्वजण जावळी तालुक्याचे ठिकाण असलेल्या मेढा नगरीत मिरवणुकीत सामील झाले होते. यावेळी मेढा पोलीस ठाण्याचे अधिकारी सुधीर पाटील यांच्यासह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
शशिकांत शिंदे मोठा झाला तर आपलं अस्तित्व संपेल या द्वेषभावनेतून आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये आपल्याच मंडळींनी मला अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु मी माझी शरद पवारांप्रती असलेली एकनिष्ठता कायम ठेवली. शरदचंद्र पवार साहेबांनी माझी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली हे माझं मी भाग्य समजतो. शरद पवार ही माझी ऊर्जा असून जावळीची जनता मी येथुन जाऊन सोळा वर्षे झाली तरी सुद्धा तेवढेच आजही माझ्यावर प्रेम करत आहे. जावळीकरांनी एकदा अजून संधी द्यावी जावळीचा संपूर्ण कायापालट करेन अशी ग्वाही राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली.
जावळी व महाबळेश्वर तालुक्याचे राजकीय दृष्ट्या वजन नव्हते. अशावेळी ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या आशीर्वादाने संधी मिळाली आणि जावळी तालुका राष्ट्रवादी मध्ये काम करत असताना जिल्हा परिषदेमध्येही सभापती पद देण्यास भाग पाडले आपल्या सर्वांचाच आशीर्वाद लाभल्यामुळे जावळीकरांना ताकद मिळाली. मला विरोध करणाऱ्यांना मी फारशी किंमत देत नाही. असेही त्यांनी स्पष्ट केले.
जावळी तालुक्यातील मावळे नेहमीच विकास कामाकडे लक्ष देतात. त्यामुळे आगामी राजकीय वाटचाल करताना जावळीकरांसी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवावा असे आवाहन आमदार रोहित दादा पवार यांनी केले. यावेळी अनेक मान्यवरांचे विचार ऐकण्यास मिळाले. या सत्कार समारंभाला मोठ्या संख्येने समस्त जावलीकर, सरपंच,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, राजकीय, सामाजिक,सहकार, क्षेत्रात व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.