श्री क्षेत्र कुसुंबी येथे श्रीमद् देवीभागवत महापुराण व प्रवचन सोहळ्याचा सप्ताह.
www.mjnewssatara.live

श्री क्षेत्र कुसुंबी येथे श्रीमद् देवीभागवत महापुराण व प्रवचन सोहळ्याचा सप्ताह.
कुसुंबी.दि.३.कुसुंबी येथे काळुबाईच्या राऊळात पवित्र श्रावण महिन्या निमित्त सोमवार दि.४ ऑगस्ट ते मंगळवार दि.१२, पर्यंत रोज सायंकाळी,७:३० ते ८:३० चालू राहिल. श्रीमद् भागवत महापुराण प्रवचन ज्ञानयज्ञ सोहळ्याचे नियोजन केले आहे.
प्रसिद्ध प्रवचनकार. कृष्णा महाराज कदम शास्त्री यांची प्रवचन सेवा संपन्न होणार आहे.
तरी अध्यात्मिक पौराणिक सुसंस्कृत भाविक भक्त यांनी या प्रवचन ज्ञानयज्ञ सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन श्री काळेश्वरी देवी देवस्थान ट्रस्ट कुसुंबी यांच्या वतीने करण्यात येत आहे.
देवी-भागवत पुराण काय आहे?श्रीमद् देवी भागवत पुराण हे संस्कृत भाषेतील एक महत्त्वाचे महापुराण आहे, जे महर्षी वेद व्यासांनी लिहिले आहे.
या पुराणामध्ये ‘देवी भगवती आदिशक्ती’ किंवा ‘दुर्गा’ या देवीचे महत्त्व केंद्रीय आहे. यात देवीला सर्व गोष्टींची निर्माता, संरक्षक आणि विनाशक म्हणून उत्सव साजरा केला जातो.
हे देवी-संबंधी विविध कथा, स्तोत्रे आणि उपदेशांचा संग्रह आहेत, ज्यात देवी महात्म्यम् देखील समाविष्ट आहे.
अनेक ठिकाणी देवी-भागवत कथांचे आयोजन केले जाते, जसे की ‘श्रीमद् देवी भागवत पुराण कथा’. आणि या पुराणातील कथा आणि उपदेश लोकांमध्ये भक्ति आणि आध्यात्मिक मुक्तीला चालना देतात. या कथांचा उद्देश धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष प्राप्ती हा असतो.
या पुराणात कलियुगातील भविष्यवाण्या देखील नमूद केल्या आहेत,
या कथांमध्ये विविध ऋषी, देवता आणि भक्तांच्या संवादातून देवीचे माहात्म्य प्रकट केले जाते. या कार्यक्रमाची सांगता
मंगळवार दि.१२/८/२०२५ रोजी श्री काळेश्वरी मातेची महाआरती, प्रवचन सांगता व महाप्रसाद होईल. आपले नम्र.श्री काळेश्वरी देवी देवस्थान ट्रस्ट.कुसुंबी