नव्याने प्रसिद्ध झालेल्या नाचणीचे गाव कुसुंबीकरांनी केली नाचणीची विक्रमी लागवड..
कुसंबीकर घेणार नाचणीचे विक्रमी उत्पादन..

नव्याने प्रसिद्ध झालेल्या
नाचणीचे गाव कुसुंबीकरांनी केली नाचणीची विक्रमी लागवड..
कुसंबीकर घेणार नाचणीचे विक्रमी उत्पादन…
कुसुंबी.दि.०१. आरोग्यदायी, बहुगुणी अशा नाचणीच्या लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत असून यावर्षी जावली तालुक्यात ४१० हेक्टर क्षेत्रापैकी १२९ हेक्टर क्षेत्रावरच नाचणीची लागवड झाली असून याची टक्केवारी फक्त ३१ टक्केच आहे. यामुळे दिवसेंदिवस कमी होणारे क्षेत्र पाहता भविष्यात हे पीक राहिल का नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
यातच समाधानाची बाब म्हणजे जावली तालुक्यातील कुसुंबी गावाने नाचणीचे गाव म्हणून गतवर्षी जाहीर होताना या पिकाच्या संवर्धनासाठी चांगले प्रयत्न करत आहेत.
हलक्या प्रतीच्या व पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत हे पीक चांगले येते. कुसुंबी गावातील कुसुंबीमुरा, चिकणवाडी या डोंगरावरील वस्त्यांमध्ये अति पावसाच्या प्रदेशात नाचणीची लागवड केली जाते.
कुसुंबी हे गाव क वर्ग देवस्थान असुन या ठिकाणी दरवर्षी सुमारे चार लाखांपेक्षा जास्त संख्येने भक्तगण दर्शनासाठी भेट देत असतात..
संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष जाहीर केले होते.. नाचणी हे पीक तृणधान्य प्रकारात मोडते.
कुसुंबी मध्ये नाचणीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामसभेत नाचणीचे गाव म्हणून बहुमताने ठराव पारित केला..यासाठी आर्थिक व तांत्रिक मदत अमेरिका स्थित महाराष्ट्र फाऊंडेशन व अवॉर्ड संस्था यांच्या सहकार्याने मिळाले. आज कुसुंबी मध्ये महिला फार्मर प्रोडूसर कंपनी सुरू असून या माध्यमातून नाचणीवर प्रक्रिया केलेले अनेक प्रकारचे पदार्थ निर्माण केले जातात आणि त्याचा बाजारपेठेत सेल केला जात आहे.. शेतकरी देखील नाचणी धान्याला मार्केट मधून मागणी असल्याने मोठ्या प्रमाणात त्यांच्या पडीक क्षेत्रामध्ये सध्या हे पीक घेत आहेत. यामुळे कुसुंबी येथील शेतकरी महिलांना आपला आर्थिक स्तर उंचवण्यासाठी संधी निर्माण झाली आहे..
रोजगार उपलब्ध होण्याबरोबरच नाचणीची मागणी ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
प्रतिक्रिया – कुसुंबी गावात पूर्वी तीस ते पस्तीस टन नाचणी उत्पादन होत होते. जिल्हा प्रशासनाच्या नावीन्यपूर्ण गाव योजनेत नाचणीचे गाव म्हणून कुसुंबीची निवड झाल्यानंतर कुसुंबीत नाचणीचे उत्पादन दुप्पट झाले असून यावर्षी शंभर टनापेक्षा जास्त उत्पादन होण्याची आशा आहे.
मारूती चिकणे
सरपंच कुसुंबी
“यावर्षी कुसुंबी गावातील शेतकऱ्यांनी नाचणीच्या लागवडीत मोठी वाढ केली आहे. मागील वर्षांच्या तुलनेत या वर्षी पेरणी क्षेत्रात 30% वाढ झाली आहे. यामागचं कारण म्हणजे गावात जागृती निर्माण होणं, नाचणीसारख्या पोषक अन्नधान्याची वाढती मागणी, कृषी विभागाची साथ व मार्गदर्शन तसेच ‘ऍग्रोमिलेट्स महिला शेतकरी उत्पादक कंपनी’च्या माध्यमातून शाश्वत बाजारपेठेचा उपलब्ध झालेला आधार. या उपक्रमामुळे महिलांना उत्पन्नाचं सुरक्षित साधन उपलब्ध झालं आहे. गावातील तरुण वर्गही आता आधुनिक पद्धतीने शेतीकडे वळताना दिसत आहे.” संगिता वेंदे ( चेअरमन )
नाचणीचे फायदे:
हाडे मजबूत करते:
नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्याने ती हाडे आणि दातांसाठी खूप चांगली असते.
पचन सुधारते:
नाचणीमध्ये फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता टाळता येते.
रक्तातील साखर नियंत्रित करते:
नाचणीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
वजन कमी करण्यास मदत करते:
नाचणीमध्ये फायबर असल्यामुळे पोट भरलेले वाटते आणि जास्त खाणे टाळता येते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
त्वचेसाठी चांगली:
नाचणीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्याने त्वचेसाठी फायदेशीर असते आणि त्वचा तजेलदार ठेवण्यास मदत करते.
हिमोग्लोबिन वाढवते:
नाचणीमध्ये लोह असल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवते.
ऊर्जा देते:
नाचणी खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते.
इतर फायदे:
नाचणीमध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि इतर आवश्यक पोषक तत्वे असतात.
हिवाळ्यात नाचणी खाल्ल्याने शरीर उबदार राहते.
नाचणी ग्लूटेन-फ्री असल्यामुळे ज्यांना ग्लूटेनची ऍलर्जी आहे, तेही खाऊ शकतात.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी नाचणी खूप फायदेशीर आहे.
नाचणीचा आहारात समावेश करणे आरोग्यासाठी खूप चांगले आहे.