ज्ञानेश्वर चिकणे यांच्या कुटुंबीयांना काळेश्वरी देवस्थान ट्रस्ट क्षेत्र कुसुंबी यांच्या वतीने धनादेश स्वरूपात आर्थिक मदत जाहीर
www.mjnewssatara.live

ज्ञानेश्वर चिकणे यांच्या कुटुंबीयांना काळेश्वरी देवस्थान ट्रस्ट क्षेत्र कुसुंबी यांच्या वतीने धनादेश स्वरूपात आर्थिक मदत जाहीर
क्षेत्र कुसुंबी.दि.२८. कुसुंबी गावातील ज्ञानेश्वर चंदर चिकणे (माऊली) यांचे अगदी तरुण वयात दुःखद निधन झाले..आणि ही घटना मनाला चटका लावणारी घडली. अनेकांची मने हळहळली, रडली ..त्या अत्यंत नम्र स्वभाव असलेल्या व्यक्तीच्या जाण्याने ते कुटुंब संपूर्णतः अनाथ झाले आहे..कसलाही आणि कोणाचाही आधार राहीलेला नाही.
पण इथुन पुढचा काळ त्या कुटुंबातील सदस्यांसाठी खूप भयानक आहे.. माउलींच्या पाठीमागे दोन लहान मुले व साधा भोळा स्वभाव असणारी त्यांची पत्नी अक्षरशः उघड्यावर पडले आहेत.
आपण सर्वांनी त्यांना आर्थिक मदत उभी केली पाहिजे ह्या हेतूने त्यांच्याकुटुंबियांना काळेश्वरी देवस्थान ट्रस्ट कुसुंबी यांच्या वतीने रक्कम 21000 हजार रुपये धनादेश स्वरूपात आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, रामदासजी वेंदे,उपध्यक्ष,विजयजी वेंदे, सचिव किसन चिकणे यांच्याकडून जाहीर करण्यात आल्याची माहिती देवस्थान सदस्य बाजीराव चिकणे यांनी दिली आहे.
हा धनादेश देण्यात आला त्यावेळी त्यांचा मुलगा स्वरुप चिकणे, देवस्थान ट्रस्ट चे पदाधिकारी सदस्य, ग्रामस्थ.संतोष चिकणे, सुर्यकांत चिकणे(DCC बँक शाखा प्रमुख),प्रेमजीत इंगवले, अशोक चिकणे, विष्णू वेंदे, जयवंत चिकणे, देवस्थान कर्मचारी. दिनकर भिलारे आदी उपस्थित होते.