मेढा पोलीसा ठाणे यांची धडक कारवाई.
मेढा पोलीस स्टेशन येथील बलत्काराच्या गुन्ह्यातील एक वर्षापासून फरारी असलेल्या आरोपीला सांगली जिल्ह्यातून अटक करून केले जेरबंद.

मेढा पोलीसा ठाणे यांची धडक कारवाई.
मेढा पोलीस स्टेशन येथील बलत्काराच्या गुन्ह्यातील एक वर्षापासून फरारी असलेल्या आरोपीला सांगली जिल्ह्यातून अटक करून केले जेरबंद.
कुसुंबी.दि.7. सुत्रांच्या माहिती नुसार
फरारी पाहीजे असले आरोपींचे शोध मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुधीर पाटील यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवुन मेढा पोलीस ठाणेचे एक विशेष पोलीस पथक तयार करून त्यांना फरारी व पाहीजे असले आरोपींचा शोध घेणेबाबत मार्गदर्शन करून सुचना दिलेल्या होत्या.
त्याप्रमाणे मेढा पोलीस ठाणेत दाखल असले गुन्हा रजि.नं. ९६/२०२४ भा.दं.वि. सं. कलम ३७६, ३७६ (२) (एन), ३७६ (३) ३६६,३४ सह बाल. लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ४,६,८,१२ प्रमाणे दि.०८/०६/२०२४ रोजी दाखल असुन सदर गुन्हामधिल फिर्यादी यांची मुलगी अ.ब.क. वय १३ वर्षे, ९ महिने हिस लग्नाचे आमिष दाखवुन तिच्या अज्ञानाचा फायदा घेवून तिला पळवुन नेहून तिच्याशी तिच्या इच्छेविरूद्ध जबरीने शरीरसंबंध केले बाबत गुन्हा रजि. दाखल करणेत आलेला आहे.
सदर गुन्ह्यातील पिडीत मुलगी हि अल्पवयीन आहे हे माहीत असताना सुद्धा आरोपी कुणाल जगदिश कांबळे वय २१ वर्षे, रा.कुमठे ता. तासगांव, जि. सांगली याने गुन्ह्यातील मुख्य आरोपी यास गुन्हा करणेकरीता आरोपी व पिडीत मुलगी यांना आश्रय देऊन गुन्ह्यास सहकार्य केलेले आहे. सदर आरोपी हा गुन्हा घडले नंतर सुमारे एक वर्षापासून फरारी झालेला होता. त्याचा वेळोवेळी खास बातमीदारामार्फत शोध घेतला. परंतु तो मिळून येत नव्हता. सदर फरारी आरोपीचे ठावठिकाण्याबाबतळ गोपनिय माहीती प्राप्त झाल्याने पोलीस ठाणेचे खास पोलीस पथक तयार करून सदर आरोपीस मौजे कुमठे ता. तासगांव जि. सांगली येथून दि.०७/०६/२०२५ रोजी ताब्यात घेवुन त्यास गुन्हात अटक केलेली आहे.
सदर कारवाई मध्ये मा. श्री.तुषार दोषी, पोलीस अधीक्षक सातारा, मा. श्रीमती वैशाली कडुकर अप्पर पोलीस अधीक्षक, मा. बाळासाहेब भालचिम, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मेढा पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सुधीर पाटील सहा. पोलीस निरीक्षक मेढा पोलीस ठाणे व पोलीस उप-निरीक्षक गंगावणे, पो.ना. बेसके ब.नं.२६८४, पो.कॉ. काळे ब.नं.२५२६, पो.कॉ. वाघमळे ब.नं.१२२८, पो.कॉ. मोरे घ.नं.१२६३ यांनी कारवाई मध्ये सहभाग घेतला आहे. सदर कामगीरी बाबत मा. श्री. तुषार दोषी, पोलीस अधीक्षक सातारा, मा. श्रीमती वैशाली कडुकर अप्पर पोलीस अधीक्षक मा. बाळासाहेब भालचिम, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग यांनी सदर कारवाई मध्ये सहभागी अधिकारी, अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.