बेवारस गाईला उपचार करून दिले जीवदान
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ योगेश माळी तसेच डॉ रूपाली मुळे यांच्या प्रयत्नांना आले यश

बेवारस गाईला उपचार करून दिले जीवदान
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ योगेश माळी तसेच डॉ रूपाली मुळे यांच्या प्रयत्नांना आले यश
एम.जे.न्युज. सातारा.प्रतिनिधी:संजय वांगडे.
निझरे.दि.28.जावली तालुक्यात कुसुंबी नजदीक असलेल्या निझरे गावाच्या हद्दीत बेवारस गाईचे अंग बाहेर आलेल्या अवस्थेत ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यांनी ताबडतोब डॉक्टर योगेश माळी आणि डॉक्टर रूपाली मुळे यांना फोन करून बोलावून घेऊन दोन तासाच्या अतोनात प्रयत्नातून गाईला जीवदान दिले. गर्भ अवस्थेत असलेली बेवारस गाई वेदना होत असलेल्या अवस्थेत निझरे ग्रामस्थांना निदर्शनास आली होती. ग्रामस्थांनी ताबडतोब डॉ माळी यांना संदेश देऊन त्यांना बोलावून त्या गाईवर उपचार करण्यात यश मिळवले. मुक्या प्राण्यांसाठी कायमस्वरूपी धावून येणारे डॉक्टर योगेश माळी आणि रूपाली मुळे यांच्या अतोनात प्रयत्नातून गाईला जीवदान मिळाले. वेण्णा दक्षिण विभागात डॉ.योगेश माळी यांनी अनेक जनावरांना रात्री-उपरात्री येऊन उपचार देऊन त्यांचा जीव वाचवला आहे. त्यांच्या प्रामाणिकपणे केलेल्या सेवेचे ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे. यावेळी निझरे गावचे सरपंच सतीश भिलारे, अजित शेडगे, उत्तम आप्पा शेडगे,सुधाकर चिकने यांनी मोलाचे सहकार्य केले.