जनसुरक्षा विधेयक विरोधात ; २२ एप्रिल रोजी सत्याग्रह
एम.जे.न्युज सातारा /राजू पवार जिल्हा प्रतिनिधी

जनसुरक्षा विधेयक विरोधात ;
२२ एप्रिल रोजी सत्याग्रह
एम.जे.न्युज सातारा /राजू पवार जिल्हा प्रतिनिधी
नांदेड: दि.21/4/2025 लोकशाही व स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या,जनसुरक्षा विधेयक विरोधात २२ एप्रिल रोजी नांदेड येथे सत्याग्रह करण्यात येणार आहे.
विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात जनसुरक्षा विधेयक येणार असून,या विधेयका विरोधात २२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ठिक ११ वा क्रांतीज्योती सावित्रीबाई, महात्मा ज्योतिबा फुले पुतळा आय. टी.आय.कार्नर जवळ ,नांदेड येथे सत्याग्रह करण्यात येणार आहे.
भारतीय संविधानाने आपणांस मानवी हक्क , भाषण स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, भ्रमण स्वातंत्र्य, उद्योग व्यवसाय स्वातंत्र्य बहाल केले आहे. मात्र शासन जनसुरक्षा विधेयक आणून मानवी अधिकारांची गळचेपी करणार आहे. मानवी अधिकार यांवर काही निर्बंध घालण्याची शक्यता आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेने दिलेले अधिकार अबाधीत (जिवंत) ठेवण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी
या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवून आपला विरोध दर्शवावा.असे आवाहन जन सुरक्षा विधेयक विरोधी समितीच्या वतीन श्याम निलंगेकर, सोपानराव मारकवाड, सुरेश राठोड, ॲडव्होकेट प्रशांत कोकणे,जयकुमार डोईबोळे यांनी केले आहे.