परिस्थितीवर मात करत ध्येयाकडे वाटचाल करणारे कलाकार कमी नाहीत जावली तालुक्यात.
असेच देहवेडे दिवदेव गावचे,सुधीर जुनघरे आणि सचिन जुनघरे बंधू..

परिस्थितीवर मात करत ध्येयाकडे वाटचाल करणारे कलाकार कमी नाहीत जावली तालुक्यात.
असेच देहवेडे दिवदेव गावचे,सुधीर जुनघरे आणि सचिन जुनघरे बंधू..
कुसुंबी, दि.03 :जावली तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. या जावली तालुक्यातील अनेकांनी आपल्या स्वतःच्या हिमतीवर कष्टाने आपलं अस्तित्व निर्माण करत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. असेच जावली तालुक्यातील दिवदेव गावातील अतिशय प्रामाणिक होतकरू ध्येयवेडे बंधू कलाकार सुधीर जुनघरे, आणि सचिन जुनघरे यांनी सुद्धा चित्रपट सृष्टी या क्षेत्रात जावली तालुका व दिवदेव गावचे नाव उंचावले आहे.
एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या सुधीर आणि सचिन यांनी स्वतःच्या हिमतीवर दिवसरात्र मेहनत व कष्टाने नावलौकिक मिळवले आहे. विशेष म्हणजे सुधीर सचिन यांनी लेखक व दिग्दर्शक म्हणून काम केलेला ‘दैत्य’ हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात ओ.टी.टी चॅनेलवर प्रदर्शित होत आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे.
तसेच सचिन आणि सुधीर यांचा हा प्रवास प्रेरणादायी जावलीकरांना, असून तमाम दिवदेवकरांना व त्यांच्या कुटूंबियांना त्यांचा अभिमान असल्याच्या भावना आहेत.
मनकीबात…सुधीर जुनघरे, सचिन जुनघरे.
सिनेमा हा भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय. आणि सिनेमा निर्मिती हे जणू शिवधनुष्यच… हेच शिवधनुष्य पेलण्याचं कार्य दिवदेव या सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील एका डोंगरावर वसलेले दिवदेव गाव याच गावचे सुपुत्र दोन भावंडे सुधीर नामदेव जुनघरे आणि सचिन नामदेव जुनघरे, लहानपणापासून सिनेमाक्षेत्राची आवड. याच आवडीतून सुधीर जुनघरे लिहू लागले. घरात रोजच येणारं वर्तमानपत्र त्याचं मार्गदर्शक झालं … कथा, गोष्टी, रहस्यमय कथा, विनोदी कथा हा सुधीर जुनघरे यांचा जॉनर बनून गेला,एक लेखक म्हणून आत्मविश्वास निर्माण झाला पंखात आलेल्या बळाने, आकाशात झेपवण्याचे स्वप्नं दाखविले. आणि मनात लहानपणापासून रुजलेले सिनेमा लेखन आणि निर्मितीचे स्वप्नं हळू हळू सत्यात उतरण्याची चिन्ह दिसू लागली..नवी मुंबई मधील कामोठ्यात सुधीर जुनघरे फिल्म विषयक अभ्यास करू लागले,बंधू सचिन जुनघरे यांचा पाठीवर कायमच हात, याच हाताची साथ त्यांना सिनेमा क्षेत्रासाठी त्यांना प्रवृत्त करु लागली… तु तुझी स्वप्नं पूर्ण कर मी तुझ्या पाठीशी आहे हे बंधू सचिन जुनघरे यांचं वाक्य सुधीर यांना बळ देऊन गेलं आणि त्यांनी या क्षेत्रासाठी वेळ देण्याचं ठरवलं. … मग सिनेमाचा अभ्यास सुरु झाला, वेगवेगळे चित्रपट, वेब सिरिज पाहणं सुरु झालं… आणि याच दरम्यान साताऱ्यातील गाव लय झ्याक ही ~वेबसिरिज पाहण्यात आली त्यातील ब्लॅक हु्यूमर सुधीर यांना खुप आवडला… मग त्यांनी त्या टीमचा शोध सुरु केला, आणि योगायोगाने त्या टीमशी त्यांचा संपर्क झाला साताऱ्यातील लेखक, दिगदर्शक जमीर आतार यांच्याशी भेटणं झालं… आणि दोघांच्या कल्पनेतून साताऱ्यातील पाहिली एका मोठया चॅनेल वर जाणारी दैत्य अ शॅडो ऑफ लव्ह या वेबसिरीजच्या पाच एपिसोडची गोष्ट एस. एस ब्रदर्स कामोठे,नवी मुंबई प्रोडक्शन या अंतर्गत निर्माण झाली … कलाकार आपल्या साताऱ्यातील असावेत ही सुधीर सरांची ईच्छा त्याप्रमाणे जास्तीत जास्त कलाकार हे साताऱ्यातील सिरीयल आणि नाटकात काम करत असणारे घेण्यात आले, त्याच प्रमाणे टेक्निशियन लाईन प्रोडूसर लोकेशन सारं काही साताऱ्यात निवडण्यात आलं…. आणि सुरु झाला दैत्य या वेबसिरीजचा प्रवास. स्वतः सचिन आणि सुधीर जुनघरे या वेबसिरीजचे निर्माते असून दैत्य वेबसिरीजसाठी सुधीर सरांनी जमीर आतार यांच्या सोबत लेखन आणि दिगदर्शन केले आहे. गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर दैत्य या वेबसिरीजचा टीझर लॉन्च करण्यात आला. त्यास रसिक माय बाप प्रेक्षकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. लवकरच ही वेब सिरिज आपणांस नामांकित ओ. टी. टी चॅनेलवर पाहवयास मिळणार आहे. सचिन आणि सुधीर या दोन भावांनी पाहिलेले स्वप्नं पुर्ण होण्याच्या दिशेने आहे…
त्यांच्या या चंदेरी प्रवासाला : एम.जे.न्यूज. सातारा.व समस्त जावलीकरांच्या लाख लाख शुभेच्छा 🌹