Uncategorized

कुसुंबी येथे अग्रोमिलेट वुमन फार्मर प्रोड्युसर कंपनीचे उद्घाटन

कुसुंबी येथे अग्रोमिलेट वुमन फार्मर प्रोड्युसर कंपनीचे उद्घाटन

कुसुंबी.दि. 29 – महाराष्ट्र फाउंडेशन, अमेरिका या संस्थेच्या आर्थिक सहकार्याने महाराष्ट्रातील
गावांच्या विकासासाठी पंचम एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून कुसुंबी गावाची निवड करण्यात आली होती. कुसुंबी गावातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी व गरिबी निर्मूलनासाठी कुसुंबी गावातील महिलांच्या पुढाकाराने व गावाच्या सहयोगाने ॲग्रोमीलेट्स फार्मर प्रोडूसर कंपनीची सुरुवात झाली आहे. अग्रोमिलेटस वुमेन फार्मर प्रोड्युसर कंपनीने स्वतःचे बेकरी उत्पादन केंद्र सुरू केले आहे. उत्पादन केंद्रासाठी कंपनीने स्वतःची भव्य असी इमारत बांधली आहे व त्यामध्ये नाचणीची उत्पादन सुरू केले आहे. महिलांच्या पुढाकाराने उभारलेल्या नाचणीच्या गावातील नाचणी बेकरी उत्पादन केंद्राच्या भव्य व सुसज्ज अशा इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आयोजित केला आहे. कंपनीचा उद्घाटन समारंभ दिनांक 30 मार्च रोजी दुपारी तीन वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होत आहे.
सन 2023 पासून कुसुंबी तालुका जावली जिल्हा सातारा येथे महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांच्या आर्थिक सहकार्याने पंचम हा एकात्मिक गाव विकास प्रकल्प अवॉर्ड संस्था सातारा यांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून गरिबी निर्मूलन हा महत्त्वाच्या उपक्रमांतर्गत गावातील महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा व शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य किंमत मिळावी या उद्देशाने महिलांनी एकत्रित येत अग्रोमिलेट वुमन फार्मर प्रोडूसर कंपनी स्थापन केली आहे. कंपनीमध्ये पाचशे महिला सभासद आहेत या मध्ये दहा महिला या विविध पदार्थ तयार करण्यामध्ये प्रवीण झाले आहेत गेली दोन वर्ष ह्या कंपनीच्या महिला विविध कुकीज व बिस्कीट तयार करून जर्मन अमेरिका यासारख्या देशांमध्ये पाठवत आहेत फराळा ते पोवाळीचा फराळ सुद्धा दोन वर्षे या महिलांनी विविध प्रतिनिधींच्या मार्फत प्रदेशात पाठवला होता या कंपनीमार्फत नाचणीला हमीभाव मिळावा. लोकांच्या आरोग्यामध्ये सुधारणा व्हावी .लोकांना पौष्टिक खाण्यासाठी मिळावे . हा कंपनीचा प्रमुख उद्देश आहे. कंपनीच्या उभारणीसाठी महाराष्ट्र फाउंडेशन यांनी निधी उपलब्धता व नाचणीच्या पदार्थ विक्री उत्पादन याच्यामध्ये विविध तज्ञ संस्था यांच्यामार्फत मार्गदर्शन करत आहेत. नाचणीपासून बिस्किटे,शेवया, पापड, लाडू अशा प्रकारची पंधरा पदार्थांची निर्मिती केली जाणार आहे. या पदार्थाची विक्री देशात व परदेशात करण्याचे नियोजित आहे. महिलांनी कृषी विज्ञान केंद्र डहाणू येथे याबाबतचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतले आहे. कंपनीच्या उभारणीसाठी ग्रामपंचायत कुसुंबी, काळेश्वरी देवस्थान ट्रस्ट व शिवप्रताप गाव विकास समिती यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button