
सावली केंद्राचा असाही रंगला आनंद सोहळा…
मेढा, दि . 7: पुस्तकी ज्ञानाबरोबरोबरच अनुभवाच्या शिक्षणाचे धडे देणारे बालआनंद मेळावे विद्यार्थ्याचे मनोबल स्थैर्य आत्मबल व आत्मविश्वास वाढविण्यास उपयुक्त असून शिक्षण विभागाचा बाल आनंद मेळावा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन सावली गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच विजय सपकाळ यांनी केले .
शिक्षण
जिल्हा परिषद, सातारा अंतर्गत प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही सावली केंद्राचा बाल आनंद मेळावा केंद्रशाळा सावली याठिकाणी उत्साहात संपन्न झाला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते .
मेळाव्यात सावली, या गवडी,आंबेघर, वागदरे,म्हाते खुर्द,म्हाते बुद्रुक, म्हाते मुरा, भामघर,गोंदेमाळ,
तळेमाळ व गाळदेव या केंद्रातील शाळांनी सहभाग घेतला.मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून सावली शाळेतील विदयार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर झाल्यानंतर मेळाव्यास सुरुवात झाली.सावली गावचे सरपंच.विजय सपकाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले .स्वतः आनंद मेळाव्यात सहभाग घेतला व मार्गदर्शनपर सर्वांना शुभेच्छा दिल्या.
विविध फनी गेम्सच्या खेळात विद्यार्थी रममाण झाले तसेच विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विविध पदार्थांच्या स्टॉल मधून व्यावहारिक ज्ञानाचे उपयोजन सुद्धा झाले.
दुपार सत्रात प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांचा विविधरंगी व बहारदार असा नृत्याचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला. विविध स्पर्धेमध्ये चमकलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
या मेळाव्यास सावली गावचे सरपंच विजय सपकाळ, ग्रामपंचायत सदस्या आनंदी जुनघरे रूपाली जुनघरे आनंदा जुनघरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद जुनघरे, उपाध्यक्ष आनंदा मोरे,केंद्रप्रमुख वंदना गंगावणे माजी विस्ताराधिकारी अरविंद दळवी, सुरेश मोरे ,सूर्यकांत मस्कर संपत भामघरे, ग्रामपंचायत सदस्या आनंदी जुनघरे,.रुपाली जुनघरे,तेजश्री जंगम,उषा जुनघरे, आदी मान्यवर उपस्थित होतेकेंद्रप्रमुख वंदना गंगावणे यांनी प्रास्ताविक केले .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्रप्रमुख वंदना गंगावणे केंद्र संचालक दीपक भोसले यांच्यासह केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक पदवीधर शिक्षक,उपशिक्षक यांनी परिश्रम घेतले सर्वांच्या सहकार्याने आनंददायी वातावरणात बाल आनंद मेळावा संपन्न झाला. सूत्रसंचालन अंकुश सपकाळ तानाजी केमदारणे यांनी केले व आभार पांडुरंग कदम यांनी मानले.
फोटो ओळी
सावली : आनंद मेळाव्याचा दिप प्रज्वलनाने शुभारभ करताना सरपंच विजय सपकाळ केंद्र प्रमुख सौ गंगावणे मान्यवर आदी .