Uncategorized

लाईनमन म्हणजे महावितरणचा आधारस्तंभ- सुरेंद्र भूतकर.

मेढा महावितरणमध्ये लाईनमन दिवस साजरा.

लाईनमन म्हणजे महावितरणचा आधारस्तंभ- सुरेंद्र भूतकर.

मेढा महावितरणमध्ये लाईनमन दिवस साजरा.

मेढा,ता.०४: महावितरणचे विजकर्मचारी म्हणजेच लाईनमन हेच महावितरणचे आधारस्तंभ आहेत. असे प्रतिपादन मेढा महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सुरेंद्र भूतकर यांनी केले आहे. महावितरणच्या मेढा उपविभागीय कार्यालयात झालेल्या लाईनमन दिनाच्या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. महावितरण मेढाचे उपकार्यकारी अभियंता सुरेंद्र भूतकर, शाखा अभियंता सुरेश कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

जनतेला अखंडित वीजपुरवठा देता यावा यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या वीजकर्मचाऱ्यांचा सन्मानार्थ साजरा केला जाणारा लाईनमन दिवस महावितरणच्या मेढा कार्यालयात उत्साहात संपन्न झाला.
अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांव्यतिरिक्त वीज (लाईट) ही मानवाची चौथी मूलभूत गरज बनली आहे. मानवाची हीच गरज पूर्ण करण्यासाठी व जनतेला अखंडित व सुरळीत वीजपुरवठा देता यावा यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांसाठी दरवर्षी ०४ मार्च हा दिवस लाईनमन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याचेच औचित्य साधत महावितरणच्या मेढा कार्यालयात लाईनमन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महावितरणचे वीजकर्मचारी म्हणजेच लाईनमन हे महावितरणच्या वीजग्राहकांना अखंडित व सुरळीतपणे वीजपुरवठा करता यावा यासाठी अहोरात्र झटत असतात. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता स्वतःचा जीव धोक्यात घालून लाईनमन हे काम करीत असतात. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करणे, विद्युत वाहिन्यांची देखभाल दुरुस्ती करणे यासह थकीत विजबिलांची वसुली करणे अशी विविध कामे लाईनमन यांना करावी लागतात. त्यांच्या या कार्याचा सन्मान महावितरणच्या मेढा कार्यालयात आज करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमात मेढा शाखेचे शाखा अभियंता सुरेश कुंभार यांनी आपल्या मनोगतात सर्व वीजकर्मचाऱ्यांना सुरक्षित काम करण्याच्या सूचना करीत सर्वांना पुढील कार्यकालासाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान या कार्यक्रमात उपस्थित लाईनमन यांनी विद्युत सुरक्षिततेची शपथ घेतली. तसेच यावेळी सर्व लाईनमन यांचा सन्मान टोपी व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. या कार्यक्रमास मुख्य तंत्रज्ञ संजय कार्वे, प्रधान तंत्रज्ञ लीलाधर कारंडे, यंत्राचालक संदीप मोहिते, प्रणित कांबळे यांच्यासह सर्व विजकर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इम्रान जमादार यांनी केले.

फोटो:मेढा: लाईनमन दिनाच्या कार्यक्रमादरम्यान अभियंता सुरेंद्र भूतकर, सुरेश कुंभार समवेत विजकर्मचारी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button