संकल्प करा, संधी घ्या आणि भविष्यातील स्थिर रोजगार मिळवा… स.पो.नि. सुधिर पाटील.
www.mjnewssatara.live

संकल्प करा, संधी घ्या आणि भविष्यातील स्थिर रोजगार मिळवा… स.पो.नि. सुधिर पाटील.
जावलीची राजधानी मेढा. दि.2. सातारा पोलीस मुख्यालय व मेढा पोलीस स्टेशन अंतर्गत “उंच भरारी योजना” – रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम २०२५ सातारा जिल्हा पोलीस दल व प्रथम एजुकेशन फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम बुधवार,१२ मार्च २०२५ रोजी सुरू होत आहे. या कार्यक्रमात जावली तालुक्यातील युवकांनी आपला सहभाग घेण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधिर पाटील यांनी जाहिर आवाहन केले आहे.
तरूण होतकरू युवकांसाठी सुवर्णसंधी असून प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असून राहण्याची आणि भोजनाची सुविधा उपलब्ध आहे. प्रशिक्षण कोर्सेस पुढील प्रमाणे उपलब्ध होणार आहेत. असिस्टंट इलेक्ट्रिशियन (हाऊस होल्ड वायरिंग व सोलर) ह्या कोर्सचे प्रशिक्षण प्रथम एजुकेशन फाउंडेशन, जिल्हा परिषद येथे असून या कोर्सचा कालावधी ४५ दिवस आहे. दुचाकी रिपेअरिंग (२ व्हिलर मेकॅनिक) याचे ठिकाण टुड सॉलिड टेक्नोलॉजीज, डहाणूकर कॉलेजजवळ, पुणे येथे असून याचा कालावधी ४५ दिवस आहे. चार चाकी रिपेअरिंग (४ व्हिलर मेकॅनिक) याचे ठिकाण: टुड सॉलिड टेक्नोलॉजीज, डहाणूकर कॉलेजजवळ, पुणे असून ह्या कोर्सचा कालावधी ४५ दिवस आहे. सदर कोर्स पूर्ण केल्या नंतर आपणास नोकरी मिळाल्यानंतर मानधन: ७,५००/- ते १५,०००/- रुपये आपण कमवू शकता.
या कोर्स साठी योग्यता १० वी पास असणे गरजेचे असून वयोमर्यादा १८ ते ३० वर्षे आवश्यक आहे.आधार कार्ड,१० वी उत्तीर्ण प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला,चार पासपोर्ट साईज फोटो (सर्व कागदपत्रे झेरॉक्स प्रती) कागदपत्रे आवश्यक आहेत. कोर्स पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षणस्थळ शिवतेज हॉल,सातारा तालुका पोलीस स्टेशन येथून सर्व मुलांना प्रशिक्षण स्थळी बसने पाठवले जाणार आहे.अधिक माहितीसाठी मो. नं. ९९३३२३३०२७ संपर्क क्रमांक ९५५२५७२०२६ संपर्क क्रमांकावर तालुक्यातील युवकांनी या सुवर्ण संधीचा फायदा घेऊन आजच आपल्या नावाची नोंदणी करण्याचे आवाहन मेढा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुधिर पाटील यांनी केले आहे.
लोकसंख्या वाढत असताना रोजगाराच्या संधी त्यानुसार वाढत नाहीत.जेव्हा एखादी व्यक्ती काम करण्यास इच्छुक असते परंतु नोकरी मिळत नाही, तेव्हा बेरोजगारी होते.यावर एकच उपाय संकल्प करा, संधी घ्या आणि भविष्यातील स्थिर रोजगार मिळवा… स.पो.नि. सुधिर पाटील