Uncategorized

वाघजाई महाकाली व विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे उद्‌घाटन.

संतोष मालुसरे

वाघजाई महाकाली व विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे उद्‌घाटन.

महाबळेश्वर. दि.7.वारसोळी देव गावचे ग्रामदैवत श्री वाघजाई देवी व श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे भव्य उद्घाटन ,प्राणप्रतिष्ठपणा आणि कलशारोहन सोहळा रविवार दिनांक ९/२/२०२५ आणि १०/२/२०२५ रोजी साधू संत तसेच राजकिय सामाजिक व्यक्तींच्या उपस्थित होणार आहे सदरच्या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब , मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील, खासदार उदयनराजे भोसले , खासदार श्रीकांतजी शिंदे, खासदार नितिन काका पाटील , आमदार शशिकांत शिंदे , नरेंद्र पाटील अध्यक्ष अण्णासाहेब पाटील आ. वि. महामंडळ महाराष्ट्र राज्य तसेच माजी आमदार दगडूदादा संकपाळ इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत ९ फ्रेबुवारी २०२५ रोजी श्री क्षेत्रमहाबळेश्वर येथे पंचगंगा स्नान व वारसोळी देव दैवतांच्या मुर्त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात येईल दि १० फेब्रुवारी रोजी सकाळी प्राणप्रतिष्ठापणा व कलशारोहण उद्घाटन सोहळा मान्यवरांचे स्वागत व दुपारी महाप्रसादचे आयोजन . तसेच मंगळवार दि ११ रोजी सत्यनारायण महापूजा सायंकाळी पालखीची मिरवणूक बुधवार १२ रोजी मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन व दुपारी कुस्त्यांचा जंगी फड आयोजीत करण्यात येणार आहेत तरी या कार्यक्रमा मध्ये सर्वांना उपस्थित राहण्याची विनंती वारसोळीदेव गावच्या ग्रामस्थांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button