क्षेत्र कुसुंबी काळेश्वरी देवी ची यात्रा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करा : तहसिलदार, हनुमंत कोळेकर.
www.mjnewssatara.live

क्षेत्र कुसुंबी काळेश्वरी देवी ची यात्रा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करा : तहसिलदार, हनुमंत कोळेकर.
क्षेत्र कुसुंबी. दि.7.उत्तर कर्नाटक, संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या क्षेत्र कुसुंबीची ग्रामदेवता काळूबाईची यात्रा दि.15 व 16 फेब्रुवारी रोजी होणार आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने पोलीस, पाणीपुरवठा, बांधकाम व महसूल, महावितरण विभागाने सतर्क राहून यात्रा सुरळीत पार पाडावी आणि भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार,हनुमंत कोळेकर यांनी केले.
यात्रासंदर्भात नियोजन करण्यासाठी दि.6.फेब्रुवारी रोजी काळेश्वरी मंदिरात प्रशासकीय बैठक जावलीचे तहसीलदार हनुमंत कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी गटशिक्षणाधिकारी, निलेश पाटील, सपोनि.सुधीर पाटील, तालुका आरोग्य अधिकारी.संदीप यादव, , महावितरणचे उपकार्यकारी अभियंता.सुरेश कुंभार. बांधकाम विभागाचे अधिकारी. कोंढाळकर साहेब,, परिवहन विभागाचे अधिकारी.निता बाबर मॅडम, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आधिकारी. डाॅ. अंकुर जगदाळे,तलाठी.बाळासाहेब करचे,ई आदी मान्यवर उपस्थित होते.
तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी या सर्व अधिकाऱ्यांना यात्रा काळात दक्ष राहून आपापल्या जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडण्यासाठी सूचना दिल्या आणि यात्रा काळात कोणकोणत्या सुविधा उपलब्ध असणार या बाबतीत संपूर्ण आढावा घेऊन योग्य त्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीसाठी कुसुंबीचे लोकनियुक्त सरपंच मारुती चिकणे, उपसरपंच निवृत्ती मोरे, कर्तव्यदक्ष पोलीस पाटील एकनाथ सुतार, काळेश्वरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रामदास वेंदे, सचिव किसनराव चिकणे, विश्वस्त संतोष चिकने तसेच ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, नेहरू युवा मंडळ सर्व पदाधिकारी, महिला वर्ग, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. मीटिंग नंतर तहसीलदार हनुमंत कोळेकर साहेब यांनी संपूर्ण पालखी मार्गाची पाहणी केली व योग्य त्या सूचना दिल्या.आलेल्या सर्व अधिकारी, पदाधिकारी यांचे आभार सरपंच मारुती चिकने यांनी मानले.