प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही. गिरी यांना ब्रिटिश नॅशनल विद्यापीठाकडून ” डॉक्टर ऑफ सोशल सायन्स”ही पदवी प्रदान.
www.mjnewssatara.live

प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही. गिरी यांना ब्रिटिश नॅशनल विद्यापीठाकडून ” डॉक्टर ऑफ सोशल सायन्स”ही पदवी प्रदान.
मेढा : दि. ५ .येथील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य,मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी यांना ब्रिटिश नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन मेरी ( युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिका ) यांचेकडून,
” वाणिज्य,विपणन आणि मानव संसाधन ” या विषयातील, *डॉक्टर ऑफ सोशल सायन्स* ” ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही.गिरी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी यांनी यापूर्वी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर १७५ शोधनिबंध सादर केले असून,त्यांना आजपर्यंत सेंट्रल क्वीन्सलँड युनिवार्सिटी, सिडने ( ऑस्ट्रेलिया ) एम.एच.वाईन युनिवर्सिटी ऑफ आप्लाईड सायन्सेस व्हिहेना( ऑस्ट्रिया ) यांनी रिसोर्स पर्सन म्हणून निमंत्रीत केले होते. तेथे त्यांनी आपले अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादर केले.त्यासाठी त्यांना युजीसीने आर्थिक पाठबळ दिले.याशिवाय एफ. आय. सी. ए. एम ( यूएसए ) व ग्लोबल कन्सोरसियम ऑफ प्रोफेशनल अँड रिसर्च (युएसए) या संस्थांनी त्यांना फेलो मेंबरशिप दिली आहे.
प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी यांच्या “ इंटरनॅशनल ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट “ शुभम प्रकाशन, कानपुर यांनी प्रकाशीत केलेल्या २१व्या संदर्भ ग्रंथाचे नुकतेच प्रकाशन झाले असून,
आजपर्यंत त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकूण 21 पुरस्कार प्राप्त झाले असून नुकताच त्यांना २०२३ मॅक्स्टेम युनिवर्सिटी ( युएसए ) यांचेतर्फे वाणिज्य विभागातील “ डिलीट “ पदवी देवून सन्मानित केले आहे. याशिवाय मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स गव्ह. ऑफ इंडिया यांच्याकडून “ डिफेन्स सेक्रेटरी कॉमेडेस आवर्ड प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र राज्यातील ते एकमेव प्राध्यापक म्हणून त्यांचा उचित गौरव केला होता.प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी हे जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित “ आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे, मागील 3 वर्षे पासुन प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या अनेक समित्यांवर ते प्रतिनिधित्व करीत असून, प्राचार्य निवडीवेळी व्ही.सी. नॉमिनी म्हणून काम करीत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल जयवंत प्रतिष्ठान हुमगावचे अध्यक्ष मा.आमदार शशिकांत शिंदे, सचिव वैशाली शिंदे,सर्व विश्वस्त, महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ.प्रमोद घाटगे सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग आणि विध्यार्थी यांनी या अतुलनीय कामगिरी बद्दल मेजर.डॉ.अशोक गिरी सर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.