उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या नांदेड दौरा: जाहीर सभेस मार्गदर्शन करणार.
एम.जे.न्युज सातारा /राजू पवार जिल्हा प्रतिनिधी नांदेड.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या नांदेड दौरा: जाहीर सभेस मार्गदर्शन करणार.
एम.जे.न्युज सातारा /राजू पवार जिल्हा प्रतिनिधी नांदेड.
नांदेड:दि.5. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुरूवारी. दिनांक ६. फेब्रुवारी नांदेडमध्ये आभार सभा आयोजित करण्यात आली आहे. मार्केट कमिटी , नवा मोंढा मैदानावर आभार, संवाद सभा आयोजित करण्यात आली आहे.
या आभार सभेला नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुरुवारी दुपारी एक वाजता शहरातील नवा मोंढा मैदानावर आभार सभा आयोजित करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या पारड्यात भरघोस मतदान देऊन महायुतीला राज्यात पुन्हा सत्तेत आणले आहे. या विजयाचे शिल्पकार ठरलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जनतेचे आभार मानण्यासाठी आणि पुन्हा जनतेशी संवाद साधण्यासाठी राज्यात आभार यात्रेच्या माध्यमातून लोकांशी हितगुज करत आहेत. याच अनुषंगाने गुरुवारी दुपारी एक वाजता नव्या मोंढा मैदानावर ते आभार
सभेला मार्गदर्शन करणार आहेत.
या सभेची तयारी विधान परिषदेचे गटनेते तथा आ. हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या सभेला शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी, शिवसैनिकांनी आणि लाडक्या बहिणींनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेंच लाडक्या बहिणीसाठी वाहनाची मोफत व्यवस्था केली आहे तर सभेला येणाऱ्या नागरिकांच्या जेवणाची आणि पिण्याचे पाण्याची व्यवस्था केली आहे असेही आ. हेमंत भाऊ पाटील यांनी सांगितले.