Uncategorized

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या लोहा तालुकाध्यक्षपदी पत्रकार शिवराज पवार यांची फेर निवड

एम.जे.न्यूज सातारा (प्रतिनिधी) वसंत सिरसाट

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या लोहा तालुकाध्यक्षपदी पत्रकार शिवराज पवार यांची फेर निवड

एम.जे.न्यूज सातारा (प्रतिनिधी) वसंत सिरसाट

नांदेड :-दि.4, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या लोहा तालुकाध्यक्षपदी वतनवाला या वृत्तपत्राचे पत्रकार शिवराज पाटील पवार यांची पाचव्यांदा फेर निवड करण्यात आली आहे.
शिवराज पाटील पवार यांचे पत्रकारिता, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य पाहता त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लोहा तालुकाध्यक्ष पदी सन 2020-21 पासून त्यांनी आजतागायत सलग चार वेळेस उत्तम जबाबदारी सांभाळली आहे. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी.आंबेगावे यांच्या आदेशानुसार व राज्य सल्लागार प्राचार्य डॉ. वसंत बिरादार, मराठवाडा संघटक बा.पु. गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांनी आता सलग पाचव्यांदा त्यांची लोहा तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याचे जाहीर केले.
शिवराज पवार यांचे संघाच्या बळकटी करणासाठीची भूमिका, पत्रकारांसह विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक या कार्य व तळागाळातील लोकांचे हाताळत असलेले प्रश्न नेहमीचा त्यांचा विधायक कामातील सक्रिय सहभाग, दांडगा जनसंपर्क पाहता त्यांची पुनश्च प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या लोहा तालुकाध्यक्षपदी निवड केली असल्याचे जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांनी जाहीर केले.
सन 2003 पासून वर्तमानपत्रात सण- उत्सव, महा पुरुषांच्या जयंती- पुण्यतिथी निमित्त तसेच वैचारिक लिखाण दृष्टिकोनातून विविध लेख प्रकाशित, सन 2016 -17 पासून आजतागायत त्यांचे वृत्तपत्र क्षेत्रा तील कार्य अतिशय उत्कृष्ट आहे.
शिवराज पाटील पवार हे पत्रकार संघाच्या नियमांचे अधीन राहून, संघ बळकटीकरण व संघाची ध्येयधोरणे पूर्णत्वास नेण्यासाठी अधिक प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या निवडीबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य सल्लागार प्राचार्य डॉ वसंत बिरादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे. विनायक सोळसे, महेश जाधव, विशाल पवार, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ अडसूळ, अशोक इंगवले, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, युवा राज्याध्यक्ष डॉ. नितीन शिंदे, युवा कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरू, विदर्भ अध्यक्ष केशव सवळकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष चिंधे, कार्याध्यक्ष शशिकांत पोरे, संपर्क प्रमुख जय कराडे, मराठवाडा संघटक बा.पू.गायकर, मराठवाडा महिला अध्यक्षा सुमती व्याहाळकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, संपर्क प्रमुख आनंद भालेराव, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, संपर्क प्रमुख संतोष वाव्हळ, कोकण महिलाध्यक्षा दीपिकाताई चिपळूणकर, कोकण संघटक श्रीराम कदम, कोकण उपाध्यक्ष योगेश भामरे, कायदेविषयक सल्लागार ॲड. अमोल सकट, ॲड.रत्नाकर पाटील, ॲड.जितेंद्र पाटील, ॲड परेश जाधव, विठ्ठल शिंदे, नांदेड जिल्हाध्यक्ष संजीव कुमार गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष भारत सोनकांबळे, जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव सोनकांबळे, महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष व तालुका पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button