कुसुंबी येथे श्री काळेश्वरी देवी(जुनेठाण)कलशारोहण कार्यक्रम सोहळा!
www.mjnewssatara.live

कुसुंबी येथे श्री काळेश्वरी देवी(जुनेठाण)कलशारोहण कार्यक्रम सोहळा!
www.mjnewssatara.live
जावली.दि.30 : कुसुंबी, सातारा येथे श्री काळेश्वरी देवी (जुनेठाण) प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण आणि कोनशिला अनावरण कार्यक्रम सोहळा ५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे.
श्री काळेश्र्वरी देवी जुनेठान जीर्णोद्धार फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात ५ फेब्रुवारीला सकाळी ७ पासून विविध धार्मिक पूजाअर्चा यांनी होणार आहे. याच दिवशी रात्री ९ वाजता महाराष्ट्राची लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. दुसऱ्या दिवशी ६ फेब्रुवारीला सकाळी ८ पासून धार्मिक कामे होणार असून याच दिवशी रात्री ९ वाजता स्वर सह्याद्री भावगीतांचा हा संगीत सोहळा होणार आहे. तिसऱ्या दिवशी ७ फेब्रुवारीला या सोहळ्यातील प्रमुख धार्मिक विधी होणार असून यात कलशारोहण आणि प्राणप्रतिष्ठा यांचा समावेश असेल. या दिवशी रात्री ९ वाजता देवीच्या जागरण गोंधळ गाण्यांचा कार्यक्रम होईल. तिन्ही दिवशी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन दुपारी १२ ते ३ आणि रात्री ७ ते १० या दरम्यान करण्यात आले आहे.
सार्वजनिक बांधकाममंत्री श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार श्री. उदयनसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली आहे. यावेळी सातारा सहकारी मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि समाजसेवक श्री. ज्ञानदेव रांजणे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. अर्चना रांजणे उपस्थित राहणार आहेत. तीर्थक्षेत्र कुसुंबी तसेच सातारा परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि देवस्थान प्रमुख सल्लागार श्री. उमेश माने तसेच स्वागत अध्यक्ष सौ. शालन गाडे यांनी केले आहे.