जी मुले आई वडिलांचा संभाळ करतात त्यांनाच वडिलोपार्जित संपत्तीचे वारस म्हणून हक्क मिळतील. ग्रामपंचायत कुसुंबी,सरपंच. मारुती चिकणे
कुसुंबी ग्रामस्थांनी घेतले क्रांतीकारी निर्णय. कुसुंबी गावामध्ये विधवा प्रथा बंद,शंभर टक्के बहुमताने ठराव मंजुर.

कुसुंबी ग्रामस्थांनी घेतले क्रांतीकारी निर्णय.
कुसुंबी गावामध्ये विधवा प्रथा बंद,शंभर टक्के बहुमताने ठराव मंजुर.
जी मुले आई वडिलांचा संभाळ करतात त्यांनाच वडिलोपार्जित संपत्तीचे वारस म्हणून हक्क मिळतील. ग्रामपंचायत कुसुंबी,सरपंच. मारुती चिकणे
क्षेत्र कुसुंबी. दि.27.नाचणीचे गाव तसेच काळेश्वरी देवस्थान म्हणून सुप्रसिद्ध असलेले कुसुंबी हे गाव अनेक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम राबवण्यासाठी सातारा जिल्ह्यात व महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे..कालच देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी संपन्न झालेल्या ग्रामसभेत अनेक ऐतिहासिक ठराव घेण्यात आले व शंभर टक्के मतदानाने मंजूर करण्यात आले.. त्यामधील दोन ठळक ऐतिहासिक निर्णय खालीलप्रमाणे..
*ठराव क्रमांक १*
कुसुंबी गावामध्ये विधवा प्रथा बंदीचा निर्णय घेण्यात आला व तो शंभर टक्के बहुमताने मंजूर करण्यात आला..
आज भारत देश विज्ञानवादी व प्रगतीशील समाज म्हणून वाटचाल करत असला तरी आजही पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातली पैंजण व जोडवी काढली जाणे, यासारख्या प्रथांचे पालन केले जाते. या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्धार कुसुंबी ग्राम पंचायतीचे सरपंच श्री मारुती चिकणे, उपसरपंच श्री निवृत्ती मोरे, ग्रामपंचायत अधिकारी श्री शंकर माने आणि त्यांच्या ग्रामसभेने घेतला. अशा प्रकारे
क्रांतिकारी निर्णयाचा ठराव करणाऱ्या कुसुंबी ग्राम पंचायतीचे सरपंच चिकणे यांनी कर्ती माणसे गेल्यानंतर विधवांचा मानसन्मान आणि समाजाचा बहिष्कार यावर उपाय म्हणून अशा प्रथा बंद करण्याचे धाडस केले आहे ..कोरोना नंतर अनेक तरुण मुली विधवा झाल्या अनेकांचे संसार उद्धवस्त झाले..विधवा महिलांना समाजात मानसन्मान मिळवुन देण्यासाठी या निर्णयाचा ठराव केल्याचे सरपंच यांनी सांगितले. पण एखादी प्रथा बंद करण्यासाठी कायद्याचा धाक आवश्यक असतो..या साठी शासनाने देखील २२ मे २०२२ रोजी शासन निर्णय जारी केला आहे याची देखील माहिती दिली..
विधवा महिलांना इतर महिलांप्रमाने सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. विधवा प्रथांचे पालन होत असल्याने प्रतिष्ठेचे जीवन जगण्याच्या मानवी तसेच संविधानिक अधिकारांचे उल्लंघन होते. त्यामुळे भविष्यात स्त्रियांच्या अधिकाराचे हनन होऊ नये, यासाठी गावातील तरुण पिढी पूढे सरसावली आहे. सर्व ग्रामस्थांनी या निर्णयाचे अनुकरण करून आदर्श ठेवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
*ठराव क्रमांक २*
अलीकडच्या काळात काही मुले आणि मुली वृद्धापकाळात आई-वडिलांचा सांभाळ करत नाहीत. मात्र, त्यांची संपत्ती घेऊन त्यांना एकटे सोडून देतात. याबाबत कुसुंबी ग्रामपंचायतीने क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. जी मुले किंवा मुली आई- वडिलांना सांभाळतात त्यांनाच वडिलोपार्जित संपत्तीचे वारस म्हणून हक्क मिळतील, असा ठराव मांडण्यात आला होता.. ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील जी मुले आई-वडिलांचा सांभाळ करत नाहीत त्यांना इथुन पुढे आई वडीलांच्या संपत्तीत वाटा मिळणार नाही.. हा ठराव ग्रामसभेत टाळ्यांच्या गजरात एकमताने संमत झाला. या दोन्ही क्रांतिकारी ठरावाचे सर्वत्र कौतुक होत आहे..