Uncategorized

खुनाचा कट व आरोपीस आश्रय देणारे गुन्ह्यातील मुख्य आरोपीसह एकुण ५ आरोपी गजाआड.

मेढा पोलीसांची दमदार कामगिरी.

खुनाचा कट व आरोपीस आश्रय देणारे गुन्ह्यातील मुख्य आरोपीसह एकुण ५ आरोपी गजाआड.

मेढा पोलीसांची दमदार कामगिरी.

जावली.दि.23.2जानेवारी रोजी मेढा पोलीस स्टेशन हद्दीत . संजय गणपत शेलार, राहणार अंधारी ता. जावली, जि. सातारा याचे प्रेत मिळुन आले असता अकस्मात मयत रजि.नं.०१/२०२५ भा.ना.सु.संहिता २०२३ चे कलम १९४ चे अन्वये नोंद करुन तपास करण्यात आला. दिनांक १५/०१/२०२५ रोजी यातील मयताची पत्नी नाव. रसिका संजय शेलार हिने मेढा पोलीस ठाणे येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा रजिस्टर नंबर ०४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये गुन्हा नोंद करुन तपास करण्यात आला असता सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल सीडीआरचे तांत्रिक विश्लेषण करुन संजय शेलार याचा खुन करणारा आरोपी रामचंद्र तुकाराम दुबळे याला दिनांक १६/०१/२०२५ रोजी अटक केली. पोलीस कोठडीत असताना आरोपी याने सांगितले की, अरुण बाजीराव कापसे याचे सांगण्या वरुन संजय शेलार याचा मी खुन केला आहे. संजय शेलार याचा खुन करण्यासाठी अरुण कापसे, रामचंद्र दुबले व विकास सावंत यांनी मिळून खुनाचा कट रचला होता असे तपासात निष्पन्न झाले आहे. दिनांक १८/०१/२०२५ रोजी विकास अवधुत सावंत वय ३५ वर्षे, व्यवसाय-बाऊन्सर, रा. आगलावेवाडी ता. जावली जि. सातारा याला अटक करण्यात आली आहे.

सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधिक्षक सो यांचे आदेशाने जितेंद्र शहाणे, पोलीस निरीक्षक यांचेकडे वर्ग करण्यात आला असता त्यांनी तात्काळ चार पोलीस पथके नेमून गुन्ह्यातील मुख्य आरोपी नामे अरुण बाजीराव कापसे याचा वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेवुन त्यास मिरज येथुन अटक करण्यात आली आहे. तसेच मुख्य सुत्रधार आरोपी अरुण बाजीराव कापसे यास पळुन जाणेसाठी मदत करणारा अजिंक्य गवळी व लपण्यासाठी आश्रय देणारा प्रशांत शिंत्रे यांनाही दिनांक २२/०१/२०२५ रोजी अटक करण्यात आली असुन सदर आरोपींना रिमांड कामी मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो, मेढा यांचेसमक्ष हजर केले असता दिनांक २८/०१/२०२५ रोजीपर्यंत ७ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अटक आरोपी यांचे नाव व पत्ते पुढीलप्रमाणे

१) अरूण बाजीराव कापसे वय ५६ वर्षे, रा. माळ्याचीवाडी ता.जि. सातारा

२) रामचंद्र तुकाराम दुबळे, वय ३७ वर्षे, रा. मतकर कॉलणी, शाहूपुरी ता.जि. सातारा

३) विकास अवधुत सावंत वय ३५ वर्षे, रा. ११३, कासाबिल्डींग, मोळाचा ओढा ता. जि.सातारा

४) अजिंक्य विजय गवळी, वय-३६वर्षे, रा.शनिवारपेठ नागोबा कट्टा मिरज, ता. मिरज, जि. सांगली

५) प्रशांत मधुकर शिंत्रे, वय-३२वर्षे, रा.मु.पो.बेळंकी, ता. मिरज जि.सांगली

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती. वैशाली कडकर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बाळासाहेब भालचिम, यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील पो.नि. अरुण देवकर, स्था.गु.शा.सातारा, पो.नि. जितेंद्र शहाणे, सपोनि अश्विनी पाटील, सपोनि अमोल गवळी, पोउपनि पांगारे, पोउपनि शिंगाडे, पोउपनि सुधीर वाळुंज, तसेच स्था.गु.शा., मेढा व वाई पो.स्टे. कडील पोलीस अंमलदार यांनी कारवाई केली आहे. सदर कामगिरीबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती. वैशाली कड़कर मॅडम यांनी सर्व अधिकारी अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास जितेंद्र शहाणे पोलीस निरीक्षक, सातारा हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button