सत्संगाशिवाय जीवनात आनंद नाही!-ह.भ.प श्रीहरी महाराज हांडेकेलूरकर.
एम.जे.न्युज/सातारा /राजू पवार जिल्हा प्रतिनिधी नांदेड .

सत्संगाशिवाय जीवनात आनंद नाही!-ह.भ.प श्रीहरी महाराज हांडेकेलूरकर.
एम.जे.न्युज/सातारा /राजू पवार जिल्हा प्रतिनिधी नांदेड .
नांदेड:दि.22/1/2025.माणसाने नेहमी साधू, संतांच्या संगतीत राहावे. जीवनात आनंद प्राप्त करावयाचा असेल तर सत्संगाशिवाय पर्याय नाही असे ह. भ. प. श्रीहरी महाराज पांचाळ हांडेकेलूरकर यांनी कीर्तनाच्या माध्यमातून बोलताना व्यक्त केले.
ते जाकापुर तालुका कंधार येथे कै. हनुमंतराव भीमराव पा.पवार( गुरुजी) यांच्या तेरवी निमीत्त आयोजित कार्यक्रमातून कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करीत होते.
पुढे बोलताना म्हणाले की लोकांकडे अफाट संपत्ती पैसा असेल तरीही त्यांना सुख समाधान मिळत नाही. अन्नदान वस्त्रदान रक्तदान हे विशेष असे दान धर्म आहे. लोकांनी जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर संत तुकाराम महाराज यांचा आदर्श घेतला पाहिजे.
ते म्हणाले की, पवार गुरुजी यांचे कार्य संघर्षशील होते .ते नेहमी साधू संतांच्या संगतीत राहत असत. त्यानी आदिवासी दुर्गम भागात नोकरी सेवा करून विद्यार्थ्यांना यशाकडे वाटचाल करण्यासाठी सातत्याने मार्गदर्शन केले.त्यांनी हजारो विद्यार्थ्यी घडविले आहेत. पवार गुरुजी यांचे कार्य म्हणजे “मरावे परी कीर्ती रुपी उरावे” असेच आहे असे महाराजांनी यावेळी सांगितले.
यावेळी हभप श्रीहरी महाराज यांचा शाल श्रीफळ पुष्पहार देऊन अंगद पवार यांनी सत्कार केला. यावेळी शेकडो भाविक भक्त उपस्थित होते. तसेंच यावेळी अन्नदान करण्यात आले.