पारनेर साहित्य साधना मंच आयोजीत कवीता वाचन स्पर्धेत ग्रामिण कवी व होरपळ कादंबरीकार गिताराम नरवडे यांचा प्रथम क्रमांक.
अहिल्यानगर प्रतिनिधी -(बाळासाहेब कोठुळे)

पारनेर साहित्य साधना मंच आयोजीत कवीता वाचन स्पर्धेत ग्रामिण कवी व होरपळ कादंबरीकार गिताराम नरवडे यांचा प्रथम क्रमांक.
अहिल्यानगर प्रतिनिधी -(बाळासाहेब कोठुळे)
दि.17.टाकळी ढोकेश्वर येथे पारनेर साहित्य साधना मंच व ढोकेश्वर महाविद्यालय तर्फे भव्य काव्य वाचन स्पर्धा आयोजीत केली होती . या स्पर्धेत गिताराम नरवडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, द्वितीय क्रमांकाचे मानकरी संजय ओहळ ठरले, सचिन चव्हाण यांनी तृतीय क्रमांक मिळवला तर पार्थ भेंडेकर, हैद्राबादची सोनाली चन्ने, अभिमान्यु शिरसाठ यांना उसेजनार्थ बक्षिसे मिळाली
सर्व पारितोषके जेष्ठ कथा, कादंबरीकार अध्यक्ष डॉ संजय कळमकर यांचे हस्ते देणेत आली. त्या वेळी परीक्षक म्हणून स्वाती ठुबे, कंकरे, राठोड यांनी काम पाहिले. त्या वेळी दॉ झावरे, मराठा प्रसारक चे विश्वस्त सिताराम खिलारी, डॉ. संजय बोरुडे, प्राचार्य संजय पठारे,ऋषिकेश ठुबे, आदी उपस्थित होते.
स्पर्धेत महारष्ट्रातून ५३ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता . महिलांची संख्या लक्षणिय होती.