Uncategorized

सातव्या वेतन आयोगाच्या थकीत हप्त्यासाठी माजी गटशिक्षणाधिकारी अशोक पवळे यांचे आमरण उपोषण लेखी आश्वासना नंतर स्थगित…….

एम.जे.न्यूज सातारा (प्रतिनिधी)वसंत सिरसाट

सातव्या वेतन आयोगाच्या थकीत हप्त्यासाठी माजी गटशिक्षणाधिकारी अशोक पवळे यांचे आमरण उपोषण लेखी आश्वासना नंतर स्थगित…….

एम.जे.न्यूज सातारा (प्रतिनिधी)वसंत सिरसाट

नांदेड :- दि.16, सातव्या वेतन आयोगातील तिसरा व चौथा हप्ता मिळावा यासाठी अनेक वेळा पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याशी अनेक वेळा प्रत्यक्ष भेटून व लेखी निवेदनाद्वारे हप्ता मिळण्या संदर्भात विनंती केली होती .परंतु सदरील हप्ते हे लवकर मिळाले नसल्यामुळे पंचायत समिती नायगाव चे सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी तथा शिक्षण सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन अशोक गंगाधरराव पवळे व जी. पी.देशमुख या दोघांच्या थकीत हप्त्यासाठी अशोक पवळे यांनी दि.9 डिसेंबर 2024 रोजी आमरण उपोषणा संदर्भामध्ये लेखी निवेदन दिलेले होते. त्यावर 9 डिसेंबर ते 15 जानेवारी 2025 पर्यंत कुठलीही कारवाई झाली नसल्यामुळे त्यांनी दि.15 जानेवारी 2025 रोजी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला. या संबंधी त्यांनी अधिकारी यांना निवेदने दिले.

त्या अनुषंगाने त्यांनी दि.15 जानेवारी रोजी उपोषणाला सुरुवात केली या उपोषणाच्या समर्थनार्थ सेवानिवृत्त संघटनेचे जिल्हा सचिव चंद्रकांत जटाळ, कार्याध्यक्ष मिराखान संघटक टेंभुर्णीकर, माधवराव शिंदे, बेळगे सर, गंगाधर मावले, दिगंबर कोरे, प्रल्हाद कदम, जी.एम.शिंदे, पांडुरंग भेलोंडे, राजू पाटील बावणे, मंगेश हनवटे, सुरेश बाराळे, डी.टी.जाधव, व्ही. सी.जाधव, भोंगाजे सर,ए.डी.गायकवाड, उत्तम वडजे, मोरगुलवार, काशेटवार, रत्नाकर कोटूरवार, जी. पी.देशमुख, इत्यादी यांनी पाठिंबा दर्शविला होता. नांदेडचे कर्तव्यदक्ष खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषद नांदेडचे शिक्षण सभापती संजय आप्पा बेळगे व श्रीनिवास पाटील चव्हाण, श्रीधर पाटील चव्हाण यांच्या मध्यस्थीने अधिकारी आणि पवळे यांच्या सोबत चर्चा करून पंचायत समिती नायगावच्या वतीने एका महिन्याच्या आत सदरील थकीत वेतन अदा करण्यासंदर्भात लेखी पत्र दिल्यामुळे श्रीनिवास पाटील चव्हाण यांच्या हस्ते उपोषणाची सांगता करण्यात आली.
यावेळी गटविकास अधिकारी वाजे गटशिक्षणाधिकारी संग्राम कांबळे, आस्थापना प्रमुख नलबलवार तसेच दाभडकर यांची उपस्थिती होती. तसेच या उपोषण स्थळी तहसीलदार डॉ.गायकवाड मॅडम यांनी भेट दिली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button