जावली तालुक्यातील क्षेत्र शेंबडी गावच्या श्री.मानाई देवीची यात्रा शनिवार दिनांक 18 जानेवारी व रविवार 19, जानेवारी 2025 रोजी संपन्न होणार.
www.mjnewssatara.live

जावली तालुक्यातील क्षेत्र शेंबडी गावच्या श्री.मानाई देवीची यात्रा शनिवार दिनांक 18 जानेवारी व रविवार 19, जानेवारी 2025 रोजी संपन्न होणार.
शेमडी.दि.15.जावळी तालूक्यातील मौजे शेंबडी येथील ग्रामदैवत श्री.मानाई देवीची यात्रा दिनांक 18 जानेवारी व रविवार 19, जानेवारी 2025 रोजी संपन्न होणार आहे.यात्रेनिमीत्त विविध धार्मिक व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
शनिवार दिनांक 18 जानेवारी रोजी सकाळी सर्व ग्रामस्थांच्या व भाविकांच्या उपस्थितीत श्री.मानाई देवीची पूजेचा विधी पार पडणार आहे. यामध्ये शनिवार दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी सकाळी 5 ते 6 वाजता देवीचा अभिषेक, सकाळी 11 ते 4 वाजेपर्यत देवाची काठी उभी करणे/देवाला मुकुट घालने / देवाला पोषाक घालने / महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, रात्री 8 ते 9 पर्यत मान्यवरांचा सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, रात्री 9 ते 12 महाराष्ट्रातील मराठी संस्कृतीचा लोककलेचा पारंपारिक कार्यक्रम ऑर्केस्ट्रा स्वरांजली कलामंच पुणे प्रस्तुत गौरव माझ्या महाराष्ट्राचा, रात्री १२ ते ०१ छबिना व तळी भरण्याचा कार्यक्रम, रात्री ०१ ते पहाटे ०५ लोककलेला टक्कर लोकनाट्य तमाशाची श्री. सुनिल बसंतराव वाडेकर (कराड) यांचा श्री. निवास ग्रुप निर्मित सोनाली गजरा लोकनाट्य तमाशा पार पडणार असून दुस-या दिवशी रविवार दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ०४.०० लोककलेला टक्कर लोकनाट्य तमाशाची श्री. सुनिल वसंतराव वाडेकर (कराड) यांचा श्री. निवास ग्रुप निर्मित सोनाली गजरा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्व भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहुन देवाच्च्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे अवाहन करण्यात अले आहे.