Uncategorized

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेची मराठवाडा विभागीय बैठक : 19 जानेवारी रोजी नांदेड येथे आयोजित

एम.जे.न्यूज सातारा (प्रतिनिधी) वसंत सिरसाट

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेची मराठवाडा विभागीय बैठक : 19 जानेवारी रोजी नांदेड येथे आयोजित

एम.जे.न्यूज सातारा (प्रतिनिधी) वसंत सिरसाट

नांदेड :- महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना राज्याध्यक्ष तथा अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष मुंबई शिक्षक आमदार ज.मो.अभ्यंकर हे दि.19 जानेवारी 2025 रोज रविवारी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. दि.10 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात येत असलेल्या अधिवेशनाच्या संदर्भात मराठवाडा विभागीय आढावा बैठकीसाठी ते नांदेडला येणार असल्याची माहिती शिक्षक सेनेचे नेते प्रदेश उपाध्यक्ष- मा. विठुभाऊ चव्हाण यांनी दिली आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष शिक्षक आमदार ज.मो.अभ्यंकर, विशेष उपस्थितीत हिंगोलीचे खासदार- नागेश पाटील आष्टीकर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लातूर जिल्हा संपर्क प्रमुख- माजी आमदार रोहिदास चव्हाण, राज्य संघटक- एकनाथ दादा पवार तर प्रमुख उपस्थिती नवनिर्वाचित शिवसेना जिल्हा प्रमुख- भुजंग पाटील डक, बबनराव बारसे, ज्योतीबा खराटे, सहसंपर्क प्रमुख- दत्ता कोकाटे, जेष्ठ नेते- प्रकाश मारावार, राज्य कोषाध्यक्ष- सुधाकर पाटील कापरे, मराठवाडा अध्यक्ष- नामदेव सोनवने, मराठवाडा कार्याध्यक्ष- बालासाहेब राखे, यांची उपस्थिती राहणार आहेत. शिक्षक आमदार ज.मो.अभ्यंकर हे दि.19 जानेवारी रोज रविवारी सकाळी 10:30 ते 3:00 या दरम्यान शासकीय विश्रामगृह नांदेड येथे शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. मराठवाड्यातील सर्व राज्य विभाग, जिल्हा व तालूका पदाधिकार्‍यांनी उपस्थीत राहावे तसेच सर्व जिल्हा परिषद, खाजगी विभागातील प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक विभागातील जिल्हास्तरीय, विभाग स्तरीय प्रलंबीत पश्न तसेच उर्दु विभागातील, आल्पसंख्क शाळा शिक्षकांचे प्रश्न समंध्दीत असतील तर दि.16 तारखे पर्यंत सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत विठुभाऊ चव्हाण, बालासाहेब राखे, संतोष अंबुलगेकर, परषुराम यसलवाड, यांच्याकडे पाठवावीत त्या नुसार आ.ज.मो.अभ्यंकर संबंधित विभागातील अधिकारी त्यात शिक्षणाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, शिक्षण उपसंचालक यांच्याशी पत्रव्यवहार करुन किंवा भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून दि.19 तारखेच्या बैठकीत सबंधित प्रश्न निकाली निघण्यासाठी किंवा मार्गी लावण्यासाठी त्यावर चर्चा करतील.
तेव्हा ज्या शिक्षक बंधू-भगिनींचे कांही प्रश्न अथवा समस्या असतील त्यांनी शासकीय विश्रामगृह नांदेड येथे वेळेत उपस्थित राहून समस्या सोडवणूक घ्यावेत व नांदेड जिल्ह्यातील शिक्षक परिवारातील सर्व पदाधिकाऱ्यांनी नियोजित वेळी उपस्थित राहावे असे आवाहन शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष- विठुभाऊ चव्हाण, जिल्हा परिषद शाळांचे जिल्हाध्यक्ष- संतोष अंबुलगेकर, खाजगी शाळांचे जिल्हाध्यक्ष- तानाजी पवार, जिल्हाध्यक्ष- परशुराम यसलवाड, रवि बंडेवार श्रीरंग बिरादार, मनोहर भंडेवार, गंगाधर कदम, अविनास चिद्रावार, कृष्णा माने, शेख मूस्तफा, प्रकाश कांबळे, राजू पवार, वसंत सिरसाट, संजय मोरे, गंगाधर ढवळे, अनिरुद्र सिरसाळकर, रवि जाधव महिला प्रतिनिधी सौ.सुकन्या खांडरे, सौ.शिवकन्या पटवे, सौ.सिमा देशमुख, सौ.शोभा गिरी, सौ.पंचफुला वाघमारे आकाश राजुरे, बालाजी राजुरे, शंकर हमद, संजय कोटगीरे, शिवकुमार निलगिरवार, लहू पंदलवाड, अमिद मोमीन, बालाजी गेंदेवाड, गोविंद आलटवाड, गोविंद सुर्वणकार संभाजी पवार, प्रकाश फुलवरे, रामदास देशमुख, देविदास जमदाडे, आनंदा सुर्यवंशी, संजय हमद, बस्वराज मठवाले, घटकार सर, आनंदा सुर्यवंशी आदीसह सर्व जिल्हा व तालूका पदाधिकार्‍यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button