सप्टेंबर मधील अतिवृष्टीचे अनुदान मिळावे म्हणून शेतकऱ्यांची ई-केवायसीसाठी शेतु केंद्रावर गर्दी.
एम.जे.न्यूज सातारा(प्रतिनिधी)वसंत सिरसाट.

सप्टेंबर मधील अतिवृष्टीचे अनुदान मिळावे म्हणून शेतकऱ्यांची ई-केवायसीसाठी शेतु केंद्रावर गर्दी.
एम.जे.न्यूज सातारा(प्रतिनिधी)वसंत सिरसाट.
नांदेड : दि.12, जिल्ह्यात माहे सप्टेबर 2024 मधील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतक-यांना मदतीसाठी शासनाने 812 कोटी मंजुर केले आहेत, परंतु ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही, त्यांनी ते करून घेणे आवश्यक आहे असे आवाहन मा.जिल्हाधिकारी यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनास प्रतिसाद देत लोहा तालुक्यातील उमरा येथील शेतकऱ्यांनी शेतु केंद्रावर ई-केवायसी करण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले.
नांदेड जिल्ह्यात माहे सप्टेंबर 2024 मध्ये अतिवृष्टी झाली होती. त्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे मोठे नुकसान झाले होते. तेव्हा ज्या शेतकऱ्यांनी पिकाच्या नुकसानी संदर्भात माहिती भरली होती. त्यांचा संदर्भ क्रमांक (व्ही.के.नंबर) त्या त्या गावाच्या तलाठयांना देण्यात आले आहेत. त्या संदर्भ क्रमांकाद्वारे सेतू सुविधा / आपले सरकार केंद्रावर जाऊन ई- केवायसी पूर्ण करणा-या शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदतीची रक्कम जमा होणार आहे. तेव्हा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी आपला संदर्भ क्रमांक घेऊन ई- केवायसी पूर्ण करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मा.अभिजित राऊत यांनी केले होते त्या आवाहनास प्रतिसाद देत उमरा येथील शेतकऱ्यांनी ई-केवायसी करण्यासाठी केंद्रावर गर्दी केल्याचे दिसून आले.