डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत पुसेगावात महास्वच्छता अभियान! श्री सेवागिरी महाराज यात्रा संपन्नतेनंतर प्रतिष्ठानचा यात्रा परिसरात महास्वच्छता अभियानाचा अभिनव उपक्रम!
१६९७ श्रीसदस्यांच्या उपस्थितीत ५७ ट्रॅक्टर ट्रॉली कचरा अवघ्या दोन तासात हद्दपार!

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत पुसेगावात महास्वच्छता अभियान!
श्री सेवागिरी महाराज यात्रा संपन्नतेनंतर प्रतिष्ठानचा यात्रा परिसरात महास्वच्छता अभियानाचा अभिनव उपक्रम!
१६९७ श्रीसदस्यांच्या उपस्थितीत ५७ ट्रॅक्टर ट्रॉली कचरा अवघ्या दोन तासात हद्दपार!
सातारा.दि.12. रायगड जिल्ह्यातील डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा ता.अलिबाग यांच्या मार्फत निष्कामतेतुन समाजसेवा,देशसेवा घडावी यासाठी स्वच्छता मोहिमेतुन देशातल्या गावागावांत नि शहरा-शहरांत स्वच्छतेचा जागर सुरू आहे.पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराज यात्रा संपन्नतेनंतर प्रतिष्ठानचा यात्रा परिसरात महास्वच्छता अभियानाचा अभिनव उपक्रम समाजाला प्रेरणा व आदर्शवत ठरला आहे.तसेच मोठयाप्रमाणावर जनजागृती होण्यास मदत झाली.
महाराष्ट्रासह,गुजरात,आंध्र प्रदेश,कर्नाटक, गोवा व इतर राज्याराज्यातुन लाखो भाविक पुसेगाव येथे श्री सेवागिरी महाराज रथोत्सव यात्रेसाठी येत असतात.तब्बल बारा दिवस यात्रा कालावधी असुन भव्य यात्रा प्रदर्शन पाहावयास मिळत असते.दरम्यान दररोज पाचसहा लाख लोक यात्रेस उपस्थित असतात.ठिकठिकाणी मनोरंजनाचे खेळ,मिठाई दुकाने तसेच विविध स्टॉल लावले जातात.या कालावधीत होणारा कचरा यात्रा संपन्न झाल्यानंतर अस्ताव्यस्त पाहायला मिळतो.निरोगी आरोग्य तसेच वातावरण प्रदुषित होवू नये यासाठी स्वच्छता अभियान व्हावे म्हणून ग्रामपंचायत व देवस्थान ट्रस्टमार्फत प्रतिष्ठानला विनंती करण्यात आली.दरम्यान मनुष्यबळ महत्वाचे असल्याने अखंड समाजसेवेचे व्रत स्वीकारणाऱ्या डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत हजारो सदस्यांच्या उपस्थितीत
श्री सेवागिरी देवस्थान मंदिर ते जुना पोस्ट रोड (रथ मार्ग गावठाण),शिवाजी चौक ते शासकीय विद्यानिकेतन गेट,यात्रा स्थळ पटांगण असा एकूण वीस एकर परिसर तसेच दुतर्फा रस्ता ७.३ किलोमीटर परिसर याठिकाणी
महास्वच्छता अभियान संपन्न होऊन १६९७ श्रीसदस्यांच्या उपस्थितीत अवघ्या दोन तासात ५७ ट्रॅक्टर ट्रॉली कचरा हद्दपार करून परिसर चकाचक झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
श्री समर्थ बैठकांच्या माध्यमातून जशी मनाच्या सांदीकोपऱ्यातील विषय-विकारांनी जन्मास घातलेल्या अज्ञानाची जाळी-जळमटं साफ झाली अगदी त्याचप्रकारे श्रीसदस्यांच्या हाती असलेला झाडू काना-कोपऱ्यात फिरल्यानं यात्रा परिसर पुसेगावनगरी स्वच्छ झाली.महाराष्ट्रभूषण पद्मश्री डॉ.श्री आप्पासाहेब धर्माधिकारी या स्वच्छतादूतांसमोर अस्वच्छतेनं अक्षरशः नांगी टाकल्याचे चित्र दिसुन आले.
समाजप्रबोधनासह समाजसेवेचा अखंड समाजहितोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे राज्यपाल नियुक्त स्वच्छतादुत महाराष्ट्रभूषण पदमश्री डॉ.आप्पासाहेब तथा दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी,रायगडभूषण डॉ.श्री सचिनदादा धर्माधिकारी,श्री उमेशदादा धर्माधिकारी,श्री राहुलदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी यात्रा संपन्न पाश्वभुमीवर पुसेगाव येथे महास्वच्छता अभियान राबविण्यात आले.
रविवारी सकाळी ७ वाजता महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ झाला.श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन व सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ सुरेश जाधव,विश्वस्त रणधीर जाधव,बाळासाहेब जाधव, सचिन देशमुख,संतोष वाघ,गौरव जाधव,माजी
विश्वस्त सुनिलशेठ जाधव,सरपंच घनश्याम मसणे, उपसरपंच विशाल जाधव, सहायक पोलिस निरीक्षक संदीप पोमण,प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.ओंकार हेंद्रे व डॉ.स्नेहा हेंद्रे,शासकीय विद्यानिकेतनचे प्राचार्य विजय गायकवाड,ज्येष्ठ नागरिक,ग्रामस्थ,तरूणवर्ग उपस्थित होते.मान्यवरांनी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले.दरम्यान ग्रामपंचायतीचे व देवस्थान ट्रस्टचे मोलाचे सहकार्य लाभले.संकलित कचऱ्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्यात आली.
सातारा,वाई,कोरेगाव,पाटण,नारळवाडी,धोंडेवाडी,कराड,नेहरवाडी,अनवडी,प्रभुचीवाडी,सातारारोड,खातगुण,बुध,निमसोड,म्हसवड,मेढा, गोळेवाडी,नांदगाव,कुडाळ,पुसेगाव,वडूज,मारूल हवेली किकली,पिलीव(सोलापुर)श्री समर्थ बैठकीघेतला.प्रतिष्ठानमार्फत राबविलेल्या स्वच्छता मोहिमेतील स्वयंशिस्त व उत्तम नियोजनामुळे अभियान यशस्वी झाले.पिण्याचे पाणी,मास्क व हातमोजे प्रतिष्ठानकडून पुरविण्यात आले होते.सदस्यांनी खराटे,दाताळे,घमेली,खोरे,झाडू आदी आवश्यक साहित्य स्वत:आणून सकाळी सात ते नऊ वाजेपर्यत स्वच्छता मोहीम सुरू होती.
प्रतिक्रिया…अभियानाचे शिस्तबद्ध नियोजन पाहून आम्ही भारावलो.समाजसेवा हीच ईश्वरसेवा यादवारे जगात स्वच्छतेबरोबर पर्यावरण संतुलनाची जनजागृती पाहता ही निष्काम सेवेची शिकवण सर्वांनी अंगिकारल्यास भारत जगात पहिल्या क्रमाकांचे राष्ट्र बनण्यास मदत होईल.डॉ.सुरेश जाधव,चेअरमन,श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट,पुसेगाव
रणधीर जाधव,विश्वस्त,श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट,पुसेगाव
प्रतिक्रिया…निस्वार्थपणे समाजासाठी सेवारूपाने योगदान देणे अतिशय कौतुकास्पद असुन जगभरातील प्रतिष्ठानचे कार्य पाहता सीमेला मर्यादा असतात परंतु सेवेला मर्यादा नसतात याची प्रचिती पाहायला मिळाली
बाळासाहेब जाधव,विश्वस्त,श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट,पुसेगाव
प्रतिक्रिया…निरपेक्षभुमीकेतून आज राबविण्यात आलेला स्वच्छता अभियानाचा उपक्रम अतिशय स्तुत्य व आदर्शवत आहे.
सुनिल जाधव,माजी विश्वस्त, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट,पुसेगाव
चौकट.
प्रतिष्ठानच्या हजारो श्री सदस्यांची स्वच्छता अभियानातील निष्काम सेवा पाहता रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना या सेवेची छबी आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह आवरत नव्हता. प्रत्येकजण कार्याचे चित्रीकरण आपापल्या कॅमेऱ्यात टिपतानाचे चित्र दिसत होते.
चौकट.प्रतिष्ठानमार्फत देशविदेशात समर्थ बैठकांच्या माध्यमातून देशाला उत्तम विचार देणारा,देशसेवा करणारा समाज घडवून दाखवला.श्रवण-मनन-निजध्यास या त्रिसूत्रीच्या माध्यमातून गेली ८३ वर्षे स्वदेव-स्वधर्म-स्वदेश ही शिकवण जनमानसांत रुजवतानाच ‘मानव ही जात आणि माणुसकी हा धर्म’ हा माणुसकीचा पाया रचला,बळकट केला.अध्यात्मिक विचारांच्या संस्कारातुन दायित्वाच्या निस्वार्थ भावनेतुन एकाच वेळी अनेक हातांना समाजपयोगी विधायक उपक्रमातुन सातत्यपुर्ण पद्धतीने समाजाप्रती असणारी कृतज्ञता ओळखुन अंतिम ध्येयापर्यंत पोहचवणे म्हणजेच डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान होय.
चौकट.अज्ञान मुल हरणम् प्रतिष्ठानचे ब्रीद!
देशविदेशात श्री समर्थ बैठकीच्या माध्यमातुन सशकत समाजमन घडविण्याबरोबरच संत विचारातुन समाजातील अज्ञान,अंधश्रद्धा,दुःख दूर करून सामाजिक एकता अखंडीत राखण्याचे कार्य गत आठ दशकांपासून धर्माधिकारी परिवार करत आहे.लहानपणापासुनच उत्तम संस्कार घडावेत यासाठी बालसंस्कार मार्गदर्शनवर्ग सुरू आहेत.