मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले ऋषिकेश कदमचे कौतुक.
एम.जे.न्यूज सातारा (प्रतिनिधी) वसंत सिरसाट

मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले ऋषिकेश कदमचे कौतुक.
एम.जे.न्यूज सातारा (प्रतिनिधी) वसंत सिरसाट
नांदेड :- जिल्हास्तरीय 52 व्या विज्ञान प्रदर्शनात लोहा तालुक्यातील सुगांव संकुलातील उमरा येथील किसान विद्यालया चा विद्यार्थी ऋषिकेश गणेश कदम याने चौकात होणारे वायू प्रदूषण यंत्रणा हा प्रकल्प सादर केला होता.
तेव्हा या प्रदर्शनात प्रकल्पाची पाहणी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा.मीनल करनवाल व शिक्षणाधिकारी मा.सलगर यांनी केली. यावेळी त्यांनी या प्रकल्पाचे बारकाईने निरीक्षण केले. व विध्यार्थी ऋषिकेश कदम याने प्रकल्पाची मांडणी चांगल्या प्रकारे केल्यामुळे त्याचे भरभरून कौतुक केले. व त्यांनी या प्रदर्शनात या प्रकल्पाची द्वितीय क्रमांकासाठी निवड केली.
या 52 व्या विज्ञान प्रदर्शनात उच्च प्राथमिक गटात उमरा येथील किसान विद्यालयाचा विध्यार्थी ऋषिकेश पार्वती गणेश कदम याने चौकात होणारे वायू प्रदूषण यंत्राची प्रकल्पाची चांगल्या प्रकारे मांडणी व सादरी करण केले होते. यावेळी किसान विद्यालयाचे मुख्याध्यापक- बी.जी. पदमवार, साईबाबा हायस्कूल चे मुख्याध्यापक एकनाथराव मोरे व मार्गदर्शक शिक्षक ए.बी.शिंदे हे उपस्थित होते.
ऋषिकेश कदमने वायू प्रदूषण प्रकल्प चांगल्या पद्धतीने सादर करून शाळेचे नाव लौकिक केल्याबद्दल संस्थेचे सचिव- स्वप्नील पाटील उमरेकर, संदीप पाटील, शाळेतील सर्व शिक्षक व गावकरी मंडळींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.