Uncategorized

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने एक एकर ऊस जळून खाक : शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान.

एम.जे.न्यूज सातारा (प्रतिनिधी)वसंत सिरसाट

नांदेड :-दि.10, लोहा तालुक्यातील उमरा येथील शेतकऱ्याचा विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून एक एकर ऊस जळल्याने शेतकऱ्याचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची घटना दि.9 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली आहे.

उमरा येथील शेतकरी सुभाषराव जगदेवराव सिरसाट यांनी वडिलोपार्जित शेत जमीन गट क्रमांक 794 मध्ये नोव्हेंबर 2023 मध्ये ऊसाची लागवड केली होती. 14 महिने झाले तरी ऊस तोडणी झाली नसल्यामुळे ऊस शेतातच उभा होता. त्यातच वीजवितरण कंपनीच्या विद्युत पुरवठ्यासाठी जाणारी लाईन या उसाच्या शेतातून गेली असल्याने खांब मोठ्या प्रमाणात वाकल्याने तारा एकमेकांच्या जवळ आल्याने शॉट सर्किट होऊन एक एकर ऊस जाळून खाक झाल्याने संबंधित शेतकऱ्याचे जवळपास दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
या घटने विषयी शेतकरी सुभाषराव सिरसाट यांनी कापशी बु. येथील 33 केव्ही वीजवितरण उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता व महसूल विभाग यांना सदर नुकसानी संदर्भात निवेदनाद्वारे माहिती दिली असून चौकशी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती.
या संदर्भात विज‌वितरण कंपनीचे अधिकारी व महसूल विभागाने या नुकसानीची पाहणी करून तसा अहवाल वरिष्ठांकडे पाठवल्याची माहिती दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button