डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची जावली तालुका कार्यकारिणी जाहीर. सुनिल धनावडे -अध्यक्ष, देवेंद्र साळुंखे -कार्याध्यक्ष.
एम.जे.न्युज. सातारा.संपादक. जितीन वेंदे

मेढा.दि.8.डिजिटल मीडिया पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्यच्या जावली तालुका अध्यक्ष पदी सुनिल आण्णा धनावडे,व कार्याध्यक्ष पदी देवेंद्र साळुंखे,उपाध्यक्ष पदी राहुल ननावरे, सचिव पदी – शेखर जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
जावली तालुका डिजिटल मीडिया संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक नुकतीच मेढा येथे पार पडली. यावेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे सातारा जिल्हा उपाअध्यक्ष युवराज धुमाळ व जिल्हा संपर्कप्रमुख सोमनाथ साखरे व जावली डिजिटल संघटनेचे मावळते अध्यक्ष भास्कर धनावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
यावेळी झालेल्या बैठकीमध्ये जावली तालुका अध्यक्षपदी सुनिल आण्णा धनावडे,कार्यअध्यक्ष पदी देवेंद्र साळुंखे, उपाअध्यक्ष राहुल ननावरे, सचिव शेखर जाधव, खजिनदार विश्वनाथ डिगे,प्रसिद्धी प्रमुख प्रसन्ना पवार, संघटक बजरंग चौधरी,सहसचिव ओमकार साखरे,सह खजिनदार संजय वांगडे, संपर्कप्रमुख जितीन वेंदे,यांची कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर करणेत आली .संघटनेचे माजी अध्यक्ष भास्कर धनावडे यांनी नुतन अध्यक्ष सुनिल धनावडे यांच्याकडे कार्यभार सोपवला तसेच नुतन अध्यक्ष सुनिल धनावडे यांचा सत्कार करण्यात आला. सातारा जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष युवराज धुमाळ व संपर्कप्रमुख.सोमनाथ साखरे यांनी नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सातारा चे उपाध्यक्ष युवराज धुमाळ, व जिल्हा संपर्क प्रमुख सोमनाथ साखरे यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना नूतन अध्यक्ष सुनिल धनावडे म्हणाले आपली संघटना वाढवणे साठी प्रयत्न करून वेगवेगळे उपक्रम राबणार आहे संघटनेच्या नावलौकीकास कुठेही तडा जानार नाही तसेच आपण सर्वानुमते दिलेली जबाबदारी सर्वांच्या विचार विनिमयानेे पार पाडण्याचा प्रयत्न करेन, उपस्थितांचे स्वागत देवेंद्र साळुंखे यांनी केले तर आभार शेखर जाधव यांनी मानले