Uncategorized

गोव्याचे लेखक कवी पत्रकारनिवृत्ती शिरोडकर यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न. केरळचे राज्यपाल, राजेंद्र आर्लेकर हस्ते राजभवन केरळ येथे संपन्न.

कराड तालुका प्रतिनिधी राहुल पवार

गोव्याचे लेखक कवी पत्रकारनिवृत्ती शिरोडकर यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न.

केरळचे राज्यपाल, राजेंद्र आर्लेकर हस्ते राजभवन केरळ येथे संपन्न.

कराड तालुका प्रतिनिधी राहुल पवार

कराड.दि.8.आजच्या युगात कवी मन हरवत चालला आहे . माणूस माणसाच्या संवेदना कुठेतरी हरवत चालल्याचही दिसून येत आहे. मात्र पत्रकार निवृत्ती शिरोडकर हे कवी मनाचे असताना त्यांनी कवितेला प्राधान्य दिलं. आणि आपली स्पंदने या कविता संग्रहामध्ये उतरवली. त्याला भविष्यातही खूप खूप शुभेच्छा. असे उद्गार केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी निवृत्ती शिरोडकर यांच्या अंतर्मनातील स्पंदने या नवीन कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा केरळ येथील राजभवन मध्ये राज्यपाल राजेंद्र पार्लेकर यांच्या हस्ते झाल्यानंतर ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.

निवृत्ती शिरोडकर यांचा कवितासंग्रह वाचत असताना एक पान उघडलं तर यामध्ये बालकविता आहे की काय? असं वाटू लागलं, परंतु नंतरच पान उघडल्यानंतर त्यांची जी स्पंदने आहेत त्यांना जे आलेले अनुभव त्यांनी कवितेमध्ये मांडलेले आहेत. त्यांचा दर्जा याही पुढे दर्जेदार कविता लिहून गोमंतकियाना एक चांगलं साहित्य द्यावं असे आवाहन केले.
कवितेची जी स्पंदने असतात ते कवितेच्या लेखणीतून त्यांनी सादर केलेली आहेत.एक चांगली कलाकृती साहित्य क्षेत्रात निवृत्ती शिरोडकर यांनी सादर केले. निवृत्ती शिरोडकर हे पत्रकारिता क्षेत्रात असताना आपला त्यांचा अनुभव पेडणे मतदारसंघात आपण लोकप्रतिनिधी असताना आला. त्यांचाही त्या विकासासाठी आणि आपल्या कार्यात मोठं योगदान असल्याचं प्रतिपादन यावेळी राज्यपाल राजेंद्र आलेकर यांनी केले. पेडणे वासियाने आपल्याला ज्यावेळी आपण आमदार मंत्री सभापती असताना जे योगदान दिलेलं आहे ते योगदान आपण कदापही विसरणार नाही. निवृत्ती शिरोडकर यांनी याहीपेक्षा सकस साहित्य निर्माण करून एक साहित्यिक म्हणून नावारूपास येत असताना सामाजिक कार्य त्याचबरोबर साहित्य क्षेत्रातही मोठे योगदान द्यावं. अशी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

निवृत्ती शिरोडकर यांच्या अंतर्मनातील स्पंदने कविता संग्रहाचे विमोचन केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते राजभवन केरळ येथे 7 रोजी झाले. यावेळी हसापूरचे सरपंच तुळशीदास गावस, पत्रकार महादेव गवंडी, नवचैतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर व कवी निवृत्ती शिरोडकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना चांदेल हसापूरचे सरपंच तथा समाजसेवक तुळशीदास गावस म्हणाले की आमचे मित्र निवृत्ती शिरोडकर यांच्या आज पुस्तक प्रकाशनासाठी आम्हाला उपस्थित राहण्याचं भाग्य लाभलेला आहे. आज हा सोहळा केरळ येथे संपन्न होत असताना केरळ या राज्याला सांस्कृतिक आणि साहित्यिकांचा वारसा आहे. आणि त्या साहित्यिक सांस्कृतिक वारसा असलेल्या भूमीत आज निवृत्ती शिरोडकरांचा पुस्तकांचा प्रकाशन होत आहे. अंतर्मनातील स्पंदने हा कवितासंग्रह फक्त निवृत्ती शिरोडकर यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देणारा नसून या अंतर्मनातील स्पंदने हा समस्त नागरिकांचा तसेच त्यांच्याभोवती आजपर्यंत झालेल्या सहवासात आलेल्या व्यक्तींचा ती स्पंदने आहेत. आणि या स्पंदनाच्या माध्यमातूनच साहित्य क्षेत्रात त्यांनी आपला मानदंड निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला आहे. त्या प्रयत्नाला आपण खूप खूप शुभेच्छा देत आहे
निवृत्ती शिरोडकर यांचा एक वैशिष्ट्य आहे की कुठल्याही प्रवासाला आम्ही ज्या वेळेला जातो. त्या वेळेला त्या ठिकाणी विविध विषय हाताळण्याचं आणि ते पत्रकारितेत आणण्याचं त्यांचं कौशल्य असतं. आणि एखादा विषय घेऊन एखादी स्टोरी करणे आणि त्यावर भाष्य करणे किंवा ती लोकापर्यंत पोहोचवणे हे कार्य त्यांनी आतापर्यंत केलेले आहे. या केरळ राज्यात आज येऊन हा कवितासंग्रह प्रकाशित होताना या ठिकाणीही वेगळं काहीतरी घडणार असे आपल्याला वाटत आहे. आणि त्याचा अनुभूतीही निवृत्ती शिरोडकराने आम्हाला निवृत्ती शिरोडकर कडून आम्हाला अपेक्षित आहे. असे गावस म्हणाले.

 

कवी निवृत्ती शिरोडकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले की अंतर्मनातील स्पंदने हा कवितासंग्रह वाचकांच्या हाती देताना अत्यानंद होत आहे. परंतु त्याचा जन्म होत असताना तो काळ आठवला की अजूनही त्या काळाच्या आठवणी स्मरणात राहतात. कोरोनाचा काळ होता, त्या काळात पत्रकारिता आणि सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास अनेक निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी हवे त्यावेळी जाण्यास अडचणी येत होत्या. त्या काळात करायचं काय? त्या काळातच या कवितांचा जन्म झाला, एक एक कविता सुचत गेली. परंतु पत्रकारितेमध्ये काम करत असताना कवितेला कुठेतरी फाटा द्यावा त्या उद्देशाने बातम्यांकडे लक्ष केंद्रित करत असताना कोरोनाच्या काळात सार्वजनिक ठिकाणी अपेक्षेनुसार फिरण्यास निर्बंध होते. त्याच काळात या कवितेने मार्ग मिळाला आणि त्याचा जन्म झाला. या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्याची एक इच्छा होती. आमच्या राज्याचे माजी मंत्री आणि राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते हा संग्रह सुरुवातीला बिहार या ठिकाणी ते राज्यपाल होते. त्या ठिकाणी प्रकाशित करण्याची इच्छा होती .परंतु त्यांची तात्काळ बदली झाल्यानंतर ते केरळ राजभवनात आले. त्या ठिकाणी आमच्या या संग्रहाचे विमोचन करण्यासाठी प्रयत्न केले आणि तो क्षण आज येत आहे. आणि त्यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा होताना अत्यानंद होत असून आयुष्यातला सर्वात मोठा क्षण आहे. आणि तो क्षण आयुष्यभर जपून ठेवण्याचं काम मी करणार आहे. या माझ्या कवितासंग्रहासाठी सदोदित सहकार्य आणि पाठिंबा देणारे माझे मित्र चांदेचे सरपंच तुळशीदास गावस पत्रकार महादेव गवंडी आणि नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर या सर्वांनी मिळून मला पाठिंबा दिला आणि हा कवितासंग्रह केरळ येथे प्रकाशन करण्याची सर्व जबाबदारी या त्रिमूर्तीने घेतली आणि या संग्रहासाठी मला ससदोदित प्रयत्न केलेले माझे मित्र चांदेल हसापूर सरपंच तुळशीदास गावस पत्रकार महादेव गवंडी नव चेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालेकर या तिघांनी मला वेळोवेळी सहकार्य करत असताना हा कवितासंग्रह चांगला दर्जेदार व्हावा आणि त्याचं विमोचन एका राज्यपालांच्या हस्ते व्हावे यासाठी माझी पत्नी सौ सुचिता शिरोडकर माझी कन्या मानसी शिरोडकर यांचेही मला सहकार्य मिळाले. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.
पत्रकार महादेव गवंडी यांनी बोलताना आमचे मित्र निवृत्ती शिरोडकर यांनी पत्रकारिता क्षेत्रात विविध प्रयोग केले. पत्रकारीता ग्रामीण भागातून त्यांनी जो वारसा चालवला तो उल्लेखनीय असा आहे. आज साहित्य क्षेत्रात त्यांचा योगदान मोठ आहे. त्यांनी गोव्यातील स्त्री कलाकारांना मोठं व्यासपीठ देण्याचं कार्य त्यांच्या हातून घडलेला आहे. या स्त्री कलाकारांच्याच माध्यमातून पत्रकार निवृत्ती शिरोडकर यांची आतापर्यंत नाट्यशेत्राविषयी आणि स्त्री कलाकारांची माहिती जाणून घेणारे एकूण तीन पुस्तके प्रकाशित झाली आहे. आणि या तिन्ही पुस्तकामुळे गोव्यात एक वेगळा आयाम साहित्य क्षेत्राला जे साहित्य संचित याला आपण म्हणू शकतो. त्या रूपाने उंमद्या कलाकारांना तसेच प्रस्थापित कलाकारांना मिळाला आहे. आज निवृत्ती शिरोडकर यांनी काव्य क्षेत्रात पदार्पण करत असताना साहित्य क्षेत्र आणि ते समृद्ध करण्यासाठी अंतर्मनातील स्पंदने हा कवितासंग्रह लिहिलेला आहे.

यावेळी बोलताना नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालेकर म्हणाले की आमचे मित्र पत्रकार निवृत्ती शिरोडकर यांचे समाजासाठी योगदान खूप मोठे आहे फक्त पत्रकार म्हणून काम न करता समाजातील विविध घटकांना आणि तो मूळ धारे द्यावा त्यांच्या समस्या सोडवण्याकडे यांचा जातीने कल असतो. बातम्या देणे हेच काम न समजता समाजाच्या हितासाठी आपणही काहीतरी योगदान द्यावे.हे कार्य त्यांच्या हातून घडताना दिसत साहित्य क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय कार्य आतापर्यंत झालेले आहे. आज या ठिकाणी त्यांचा अंतर्मनातील स्पंदने हा कवितासंग्रह आमचे राज्यपाल राजेंद्र आलेकर यांच्या हस्ते प्रकाशित होताना आनंद होत आहे. आज या कवितासंग्रहाच्या माध्यमातून आमचे हळव्या मनाचे कवी पत्रकार निवृत्ती शिरोडकर यांच्या अंतर्मनातील स्पंदने आम्हाला वेगळ्या अर्थाने या कवितासंग्रहाच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळी सरपंच तुलसीदास गावस, महादेव गवंडी, कृष्णा पाल ये कर, राज्यपाल राजेंद्र आले कर प्रमुख उपस्थिती होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button