संजय शेलार यांच्या मृत्यूचा तपास जलदगतीने व्हावा यासाठी ग्रामस्थांची पोलिस स्टेशनला धाव…. आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाल्यास जनआंदोलन पुकारावे लागेल… ग्रामस्थांचा इशारा…
mjnewssatara.live

मेढा.दि.5.संजय शेलार याचा अपघाती मृत्यू नसून त्याचा घातपात करून त्याला जीवे मारण्यात आले आहे पोलीस यंत्रणेने तपासात दिरंगाई न करता संजय संजय शेलार यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या मुख्य आरोपीला गजाआड करावे. राजकीय दबावाला बळी पडून आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाल्यास कोयना विभागाच्या वतीने जनआंदोलन पुकारण्यात येईल. असा इशारा संजय शेलार यांचे नातेवाईक व अंधारी ग्रामस्थांनी मेढा पोलीस स्टेशनला आज दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
अंधारी ता. जावळी येथील संजय गणपत शेलार याचा मृतदेह २ जानेवारीला गावच्या वरच्या बाजूला जंगलात आढळला होता. त्याचा मृत्यू छातीला जोरदार मार लागल्याने झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईक व्यक्त करत असताना आज चार दिवसांनंतर ही ह्या घटनेबाबत कोणालाही अटक अथवा संशयित कोणी ताब्यात आले नसल्याने तपासात गती येत नसल्याचा आरोप करत मृत संजय चे नातेवाईक व शेकडो ग्रामस्थ यांनी मेढा पोलीस ठाण्यामध्ये येऊन सपोनि अश्विनी पाटील यांची भेट घेतली व तपासाबाबत चौकशी केली.
यावेळी आमच्या पद्धतीने योग्य तो तपास सुरू असून ज्या ज्या मार्गावर मृत संजय व त्याला घेऊन येणारा साथीदार याला त्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज ,फोन कॉलिंग रिपोर्ट , तपासण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर प्रत्येक संशयित व्यक्तीकडे कसून चौकशी सुरू आहे .या घटनेत आरोपीला नक्की गजाआड करून. कुठलाही राजकीय दबाव आमच्यावर नसून आमच्या पद्धतीने तपास सुरू आहे .दोन दिवसात याबाबतचे सत्य बाहेर येईल व मुख्य सूत्रधार आमच्या ताब्यात असेल .असे आश्वासन मेढा पोलिस ठाण्याच्या सपोनि अश्विनी पाटील यांनी दिला.
संजय शेलार यांच्या मृत्यूबाबत तर्कवितर्क केले जात असून आलेल्या ग्रामस्थ व नातेवाईक यांनी सरळ सरळ एका व्यावसायिक बड्या नेत्यावर आरोप केले आहेत.संबंधितच व्यक्ती संजयच्या मृत्यूला जबाबदार असून पोलीस यंत्रणा त्या व्यक्तीची चौकशी का करत नाही असाही आरोप केला .आम्हाला न्याय न मिळाल्यास जनआंदोलन पुकारावे लागेल असाही इशारा यावे देण्यात आला.
याप्रसंगी मयत संजयचे वडील गणपत विठ्ठल शेलार के के शेलार चंद्रकांत शेलार एकनाथ शेलार अरुण शेलार अशोक शेलार लक्ष्मण शेलार रखमाजी शेलार महादेव शेलार उत्तम शेलार भाऊसाहेब शेलार मारुती शेलार आनंदा शेलार आनंदा बाळू शेलार सिताराम शेलार लक्ष्मण शेलार तानाजी शेलार संतोष पांडुरंग शेलार दौलती शेलार धोंडीबा नारायण शेलार अंकुश शेलार धोंडीबा कृष्णा शेलार पांडुरंग शेलार शिवराम शेलार रामचंद्र शेलार शिवराम जाधव इत्यादी सह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
X नातेवाईकांची तक्रार घेण्यास टाळाटाळ का?
X संशयीत व्यक्तीच्या नांवानिशी ग्रामस्थ व नातेवाईक सरळ सरळ आरोप करत असताना , पोलीसांचा तपास विरुध्द दिशेने सुरु आहे.
X आक्रमक झालेलेले शेकडो ग्रामस्थ आश्वासनानंतर परत गेले.