नाविन्यपूर्ण क्षेत्रात करिअरच्या वाटा शोधणारी हीच खरी ग्रामीण हिरे आहेत-ज्येष्ठ नेते उद्धवराव वाघ.
अहिल्यानगर प्रतिनिधी -बाळासाहेब कोठुळे.

नाविन्यपूर्ण क्षेत्रात करिअरच्या वाटा शोधणारी हीच खरी ग्रामीण हिरे आहेत-ज्येष्ठ नेते उद्धवराव वाघ.
अहिल्यानगर प्रतिनिधी -बाळासाहेब कोठुळे.
दि.5.जवखेडे खालसा येथील श्री कानिफनाथ माध्यमिक व कै. रघुनाथ पाटील वाघ कनिष्ठ महाविद्यालयातील माजी विद्यार्थी चि. ऋषिकेश अशोक वांढेकर रा.मोहोज खुर्द यांची IFSCA भारत सरकार या विभागात अधिकारी ग्रेड ए म्हणून निवड झाली . यावेळी संस्था अध्यक्ष उद्धराव वाघ पाटील यांच्या शुभहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. शाळेला भूषण असलेली ही गोष्ट असून ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थी ही नवनवीन क्षेत्रामध्ये आपलं उज्वल भविष्य आजमावित आहेत पण यासाठी स्वयंअध्ययन, जिद्द, चिकाशी, अभ्यास आणि मार्गदर्शन यातूनही आपण यश मिळू शकतो याचे जिवंत उदाहरण ऋषिकेशने घालून दिले आहे हे इतर सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घेण्यासारखे आहे. त्याच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले .यावेळी श्री संभाजी आंधळे हवालदार,श्री.पवन सरगड, विद्यालयाचे प्राचार्य श्री संपत वांढेकर, पर्यवेक्षक गिरी सर, सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन श्री शेंदुरकर सर प्रा. नांगरे सर ,श्री मतकर सर यांनी केले. प्रास्ताविक विद्यालयाचे समन्वयक श्री संजय ससाने सर यांनी तर आभार श्री कांबळे बी के यांनी केले.