साधुसंतांच्या या देशात प्रत्येकाने आपआपल्या क्षेत्रातील माणूसकी व प्रामाणिक पणा जपावा : डॉ. शिवाजीराव शिंदे
एम.जे.न्यूज, सातारा(प्रतिनिधी)वसंत सिरसाट.

साधुसंतांच्या या देशात प्रत्येकाने आपआपल्या क्षेत्रातील माणूसकी व प्रामाणिक पणा जपावा : डॉ. शिवाजीराव शिंदे
एम.जे.न्यूज, सातारा(प्रतिनिधी)वसंत सिरसाट.
नांदेड :- दि.5, साधुसंतांच्या या देशात प्रत्येकाने आपआपल्या क्षेत्रातील माणूसकी व प्रामाणिक पणा जपावा असे प्रतिपादन प्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉ. शिवाजीराव शिंदे यानी केले. दि.3 जानेवारी 2025 रोजी कै.माधवराव रावण पाटील पांडागळे गुरुजी यांच्या 9 व्या पुण्यस्मरणार्थ कंधार तालुक्यातील दही कळंबा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. पांडागळे गुरुजींनी ज्या ज्या गावात नोकरी केली त्या त्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक साहित्य वाटप करून पुण्यतिथी साजरी करण्याचा उपक्रम अतिशय प्रेरणादायी व समाजपयोगी आहे. कै.माधवराव पांडागळे गुरुजीचा विद्यार्थी म्हणून मला त्यांचा अभिमान आहे. माझे वडील अडाणी असताना व कोणतीही सुखसुविधा नसताना कै.माधवराव गुरुजी सारख्या समर्पीत गुरुजनामुळेच मी घडलो असी भावना डॉ. शिंदे यांनी व्यक्त केली. व शिक्षकनेते दत्तप्रसाद पांडागळे व परमेश्वर पांडागळे यांचे अभिनंदन केले. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व कै.माधवराव पांडागळे गुरुजी यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ.गोविंदराव नांदेडे तर प्रमुख अतिथी व विशेष सत्कारमुर्ती म्हणून प्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉ.शिवाजीराव शिंदे, प्रमुख म्हणून माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव कपाळे,भाजपाचे जिल्हाप्रवक्ते संतोष पांडागळे, MGB बँकेचे डीवीजनल मॅनेजर सुदर्शन पांडागळे, सरपंच खुशाल पाटील पांडागळे, मालीपाटील व्यंकटराव पांडागळे, STI नंदकुमार भुरे, केंद्रप्रमुख प्रवीण पाटील, जी.के.शेख, ग्रामविकास अधिकारी अमृत शिंदे, मारोतराव शिंदे, सरपंच अवधुत शिंदे यांची उपस्थिती होती.
डॉ.गोविंद नांदेडे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की सद्यास्थितीत सर्व सुखसोईनी युक्त वातावरणात विद्यार्थ्यांनी जिद्दीने मेहनत घेवून शिक्षण घ्यावे, उद्याचे उज्वल भविष्य तुमची वाट पाहत आहे. समृद्ध व विकसीत भारत शाळेच्या वर्ग खोल्या मधून घडत असतो. शाळा हेच भविष्य निर्माणाचे व समृद्ध भारताचे केंद्र आहे असे सांगुन गावकऱ्यांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले. तसेच विद्यार्थी, पालक, व शिक्षकांना अतिशय प्रेरणादायी मार्गदर्शन केले. मागील 9 वर्षांपासून पुण्यतिथी निमित शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमाबद्दल पांडागळे कुंटूबियांचे अभिंनदन केले.
यावेळी शिवाजीराव कपाळे, संतोषराव पांडागळे, मारोतराव शिंदे, खुशाल पाटील पांडागळे, व्यंकटराव पांडागळे, अमृत शिंदे यांचीही भाषणे झाली. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधुन शिक्षिका सौ.सपना छत्रे व सौ.उमा निलावार यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक दत्तप्रसाद पांडागळे यानी केले. तर सुत्रसंचलन शंकर काळेवाड व बाळासाहेब पांडागळे यांनी केले.व आभार परमेश्वर पांडागळे व बालाजी कनशेटे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक संजय धुत व सर्व शिक्षकानी सहकार्य केले.
कार्यक्रमास घनश्याम पाटील किडे, शिवदास गुरुजी पांडागळे, गोविंद पाटील कपाळे, आनंदराव पांडागळे, मुक्ताराम पांडागळे, किशनराव शिंदे, प्रा सिध्देश्वर शेट्टे, श्रीमती सुभद्राबाई पांडागळे, बालाजी गलांडे, तसेच गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.