Uncategorized

नांदेड जिल्ह्यात सौर ऊर्जा निर्मितीसाठी 82 गावांतील 1399 एकर जमीन संपादित : उमरा येथे 8 तर बामणी येथे 5 मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित.

एम.जे.न्यूज सातारा(प्रतिनिधी)वसंत सिरसाट.

नांदेड जिल्ह्यात सौर ऊर्जा निर्मितीसाठी 82 गावांतील 1399 एकर जमीन संपादित : उमरा येथे 8 तर बामणी येथे 5 मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित.

एम.जे.न्यूज सातारा(प्रतिनिधी)वसंत सिरसाट.

नांदेड : शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा मिळावा आणि रात्रीच्या दुष्टचक्रातून त्यांची सुटका व्हावी, यासाठी शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ही योजना सुरू केली आहे.या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील कापसी बु.उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या उमरा येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठा 8 मेगावॅट क्षमतेचा, तर बामणी येथे 8 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. सदर प्रकल्प दि.31डिसेंबर 2024 रोजी कार्यान्वित करण्यात आला असून, जिल्ह्यात 68 उपकेंद्रांकरिता 82 गावांतील 1399 एकर जमीन संपादित करण्यात आली आहे.
उमरा येथे 45 एकर जागेवर 550 मेगावॅट्स क्षमतेच्या 17 हजार 453 सोलार पॅनल्सच्या माध्यमातून चार एमव्हीए क्षमतेच्या दोन स्टेप अप ट्रान्सफॉर्मरमधून 15 किलोमीटर 33 केव्ही कापसी उपकेंद्र ते उमरा येथे 11केव्ही लाईन उभी करून याचे वहन केले जात आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पामुळे कापसी उप केंद्रांतर्गत 48 गावांतील 1269 शेती पंपांना दिवसा वीजपुरवठा मिळत आहे. जिल्ह्यातील 123 उपकेंद्रा अंतर्गत 567 मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीचे लक्ष असून, त्याकरिता 2855 एकर जागेची आवश्यकता आहे. आजपर्यंत 68 उपकेंद्रांकरिता 82 गावांतील 1399 एकर जमीन संपादित करण्यात आली असून, त्यातून 290 मेगावॅट सौरऊर्जा निर्माण होणार आहे. याचा थेट लाभ हजारो शेतकरी बांधवांना होणार आहे.
महाराष्ट्र शासनाने युद्धस्तरावर प्रदूषणमुक्त हरित ऊर्जा देण्यासाठी काम हाती घेतले आहे. मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजना 2:0 अंतर्गत बामणी बु.येथे 5 मेगावॅट क्षमतेचे, तर कापसे उपकेंद्रांतर्गत उमरा येथे 8 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होऊन शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होणार आहे. या सौर प्रकल्पाची पाहणी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांच्याकडून करण्यात आली.
यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव, देवेंद्र गिल्लुरकर, स्वप्निल जोशी हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button