खा.रवींद्र चव्हाण आज माळेगाव येथील श्रीक्षेत्र खंडोबा देवदर्शन घेणार!! शहरात विविध कार्यक्रमास उपस्थित राहणार.
एम.जे. न्यूज सातारा /राजू पवार जिल्हा प्रतिनिधी नांदेड .

खा.रवींद्र चव्हाण आज माळेगाव येथील श्रीक्षेत्र खंडोबा देवदर्शन घेणार!! शहरात विविध कार्यक्रमास उपस्थित राहणार.
नांदेड:दि.5.खासदार रवींद्र चव्हाण हे आज नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र खंडोबा माळेगाव यात्रेला भेट देणार असून श्री खंडोबा देवाचे दर्शन घेणार आहेत. तसेच त्यांच्या हस्ते आज दिनांक 5 जानेवारी रविवार रोजी यात्रेतील कुस्त्याचे उद्घाटन होणार आहे. तसेच ते शहरातील विजयनगर येथील हनुमान मंदीर मंगल कार्यालयात आयोजित मराठा वधू वर परिचय मेळाव्यास सकाळी ठीक11 वाजता उपस्थित राहणार आहेत. तसेच ते दुपारी माळेगाव यात्रेसाठी
श्री खंडोबा देव दर्शनासाठी रवाना होणार आहेत. तसेच ते दुपारी दोन वाजता पेनुर रोड येथील महादेव मंदिर दर्शन आणि मौजे सेनगाव (कु.) तालुका लोहा येथील संतराम जाधव यांच्या सेवानिवृती गौरव सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.तसेच सायंकाळ ठीक 6 वाजता मिनी रेस्ट हाऊस नांदेड येथे पत्रकार पुरस्कार पुरस्काराचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.