जावली तालुक्यातील सावली गावाने सामाजिक एकतेतून स्वच्छतेचा दिला संदेश.
एम.जे.न्युज. सातारा.

जावली तालुक्यातील सावली गावाने सामाजिक एकतेतून स्वच्छतेचा दिला संदेश
मेढा, दि ३१ :जावळी तालुक्यातील सावली गावाने सरत्या वर्षाला महा श्रमदानाने निरोप देऊन आपलं गाव स्वच्छ आणि सुंदर श्रमदानातून केलं यामुळे सावलीकरांचं अनेकांनी कौतुक केलं .
तालुक्याचे नेते व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य व नववर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाला रामराम करण्यासाठी मोठ्या उत्साहात शेकडो महिला व ग्रामस्थ एकत्र येऊन संपूर्ण गावात स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवून गावातील रस्ते नाले शाळा परिसर स्वच्छ आणि सुंदर गेले . यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा सावली व क्रांती विद्यालय सावलीचे शिक्षक व विद्यार्थी यांनीही स्वच्छता अभियानात सहभाग घेतला .
सावली गावचे लोकनियुक्त प्रथम सरपंच विजय सपकाळ यांच्या संकल्पनेतून हा महाश्रमदानाचा अभियान घेण्यात आले .यामध्ये शेकडो हातांनी राबवून स्वच्छ आणि सुंदर गाव करण्यासाठी नव वर्षाच्या पुर्व संधेला श्रमदान घेतले .
त्यामध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी अजिंक्य नेहरू युवा मंडळ, ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ यांनी सक्रिय सहभागी होऊन स्वच्छतेचा नवसंदेश सर्वांना दिला .
यामध्ये ग्रामपंचायत अधिकारी दिलीप राक्षे, सदस्य आनंदा जुनघरे, मंडळाचे अध्यक्ष संदीप म्हस्कर, उपाध्यक्ष सुशांत जुनघरे, प्रकाश जुनघरे, विजय जुनघरे गुरुजी माजी सरपंच दुर्योधन जुनघरे, माजी सरपंच नंदा जुनघरे, फुलाबाई जुनघरे,
मंडळाचे माजी अध्यक्ष बाबुराव जुनघरे, रमेश म्हस्कर, ग्रामपंचायत कर्मचारी रविंद्र जुनघरे यांच्या सह अनेक जण मोठया संख्येने उपस्थित होते .
कोट :विजय सपकाळ सरपंच
सरते वर्षाचा शेवट होताना या वर्षाबरोबरच गावातील अस्वच्छता जावून स्वच्छ आणि सुंदर सावली करण्याचा ग्रामस्थांचा नववर्षाचा हा कृतीतून केलेला महासंकल्प आहे . स्वच्छता आणि आरोग्य ही मानव जीवनात महत्वपूर्ण आहे .
फोटो : सावली : येथे रस्त्यांची स्वच्छता करताना महिला .