श्रीक्षेत्र खंडोबा माळेगाव यात्रेस 29 डिसेंबर पासून प्रारंभ: उपमुख्यमंत्री पवार देव दर्शनासाठी येणार.
एम.जे.न्यूज.सातारा/ राजू पवार जिल्हा प्रतिनिधी नांदेड.

श्रीक्षेत्र खंडोबा माळेगाव यात्रेस 29 डिसेंबर पासून प्रारंभ: उपमुख्यमंत्री पवार देव दर्शनासाठी येणार.
एम.जे.न्यूज.सातारा/ राजू पवार जिल्हा प्रतिनिधी नांदेड.
नांदेड: दि 29 डिसेंबर.श्री क्षेत्र खंडोबा माळेगाव यात्रा दिनांक 29 डिसेंबर पासून प्रारंभ झाला असून ही यात्रा5 डिसेंबर पर्यंत चालणार आहे. यात्रेची प्रशासनाकडून जयत तयारी सुरू झाली आहे. दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा असून या यात्रेसाठी आंध्र प्रदेश कर्नाटक राज्यातून तसेच हिंगोली, परभणी, लातूर या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात यात्रेकरू येत असतात. या यात्रेसाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना आमंत्रित करण्यात आले आहे.ही यात्रा दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे.
या ठिकाणी श्री खंडोबा देवाचे पुरातन मंदिर असून यात्रेस चारशे वर्षांपूर्वीचा इतिहास आहे.
यात्रेसाठी परभणी हिंगोली नांदेड तसेच आंध्र प्रदेश कर्नाटक मधूनही मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात. प्राण्यांचा बाजार या यात्रेची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. त्या ठिकाणी उंट, घोडा, कुत्रे यांची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री करण्यात येत असते. तसेच मुख्य रस्त्याच्या 26 ठिकाणी सीसीटीव्ही याची सुद्धा निगराणी करण्यात आली आहे.
दिनांक29 डिसेंबर रोजी देव स्वारी व पालखी पूजन दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी अश्व श्वान कुक्कुट प्रदर्शन व विविध स्पर्धांचे उद्घाटन तसेच महिला व बालकांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दि.2 जानेवारी रोजी कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन व कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे तसेच लावणी महोत्सवाचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे दिनांक 3 जानेवारी रोजी आरोग्य शिबिर चे उद्घाटन करण्यात येणार आहे तसेच पारंपरिक लोक कला महोत्सव हे सुद्धा आयोजीत करण्यात आले आहे त्याचप्रमाणे दि 4 जानेवारी 2025 रोजी शंकर पट बैल जोडी बैलगाडा शर्यत ठेवण्यात आली आहे. तसेच 5 जानेवारी 2025 रोजी पशुप्रदर्शन व दुग्ध स्पर्धा बक्षिस वितरण समारंभाचा कार्यक्रम आयोजन करण्यात येणार आहे .त्याचप्रमाणे दि.5 जानेवारी रोजी कुस्त्यांची प्रचंड दंगल आयोजित करण्यात आली आहे.
लाईट चे नियोजन करून 60विद्धूत पोल सोयीसाठी बसविण्यात आले आहेत तर लिंबोटी धरणाचे पाणी माळेगाव येथे आणण्यात आले आहे.यात्रेकरुसाठी शुद्ध फिल्टर पाण्याची सोय करण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त यात्रेकरूंनी या यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
दरम्यान माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहनसिंग यांच्या निधनामुळे दुख:वटा पाळण्यात आलेला असून; यात्रेचा कालावधी वाढविण्यात आला आहे. सदरील यात्रा ही 5 डिसेंबर पर्यंत चालणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.