
जितीन वेंदे
दि.28.क्षेत्र कुसुंबीची काळुबाई दिनदर्शिका प्रकाशन सोहळा सण-२०२५ आज मोठ्या आनंदात संपन्न झाला. तीर्थक्षेत्र नाचणीचे गाव कुसुंबी म्हणून महाराष्ट्रभर ओळख असणाऱ्या श्री काळेश्वरी मातेच्या दर्शनासाठी अनेक भाविक भक्त येत असतात. श्री काळेश्वरी देवी देवस्थान ट्रस्ट कुसुंबी यांच्या
माध्यमातून कुसुंबीची काळुबाई दिनदर्शिका महाराष्ट्रभर पोचली जाते या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा आज मोठ्या उत्साहात आनंद वातावरणात संपन्न झाला या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आंबेघर गावचे सुपुत्र, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक,समाजसेवक श्री ज्ञानदेवजी रांजणे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले आई काळेश्वरी मातेच्या आशीर्वादाने आणि कुसुंबी ग्रामस्थांच्या वतीने केलेल्या नवसामुळेच माननीय.आ. श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले असे मत व्यक्त केले तसेच दक्षिण विभाग २१ गाव कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय अंकुशदादा शेलार ,उत्तम शेडगे तसेच कुसुंबी गावचे लोकनियुक्त सरपंच श्री मारुती चिकणे बापू कुसुंबी गावचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील एकनाथ सुतार, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुर जगदाळे, काळेश्वरी देवस्थान ट्रस्टचे सचिव किसनराव चिकणे, उपाध्यक्ष विजय वेंदे, विश्वस्त श्री.संतोष चिकणे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नामदेव चिकणे, नितीन सोनटक्के, शशिकांत चिकणे तसेच पत्रकार, संजय वांगडे, विश्वनाथ डिगे व कुसुंबी गावातील समस्त ग्रामस्थ, महिला वर्ग, माहेरवाशीण,तरुणवर्ग, मोठ्या संख्येने उपस्थित होता. सुरुवातीपासून दिनदर्शिका कशा पद्धतीने चालू झाली याची माहिती विश्वस्त संतोष चिकणे यांनी दिली दिनदर्शिकेचे उद्घाटन महिलांनी हळदीकुंकू वाहून पूजन करून केले मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीस दिनदर्शिकेची प्रत देण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत चिकणे यांनी केले तर विश्वस्त संतोष चिकणे यांनी आभार मानले.