महाराष्ट्र ग्रामीण
काँग्रेसचा विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणारे सक्रिय कार्यकर्ते जे.के.पाटील यांचे दुःखद निधन.
सातारा कराड प्रतिनिधी. राहुल पवार.

काँग्रेसचा विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणारे सक्रिय कार्यकर्ते जे.के.पाटील यांचे दुःखद निधन.
सातारा कराड प्रतिनिधी. राहुल पवार.
दि.28.कराड तालुक्यातील.वडोली गावचे माजी पोलीस पाटील राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष जोतीराम किसन पाटील दादा(जे.के.पाटील)यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी पहाटे दुःखद निधन झाले.त्यांनी भारतीय सैन्यदलात १७वर्षे देशसेवा केली.त्यांनतर एसटी महामंडळात सेवा केली.तसेच गावचे पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष पदावर काम केले राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष होते सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग होता.त्यांचे पश्चात ३मुले,१मुलगी,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांचा रक्षा विसर्जन आणि दशक्रिया कार्यक्रम रविवार दि.२९/१२/२०२४रोजी सकाळी ९वाजता वडोली निळेश्वर येथे होणार आहे.*