नांदगाव / चिंचोली जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहलीतून ऐतिहासिक अन् प्रेक्षणीय स्थळांचा घेतला मनसोक्त आनंद
एम.जे.न्यूज सातारा, (प्रतिनिधी ) वसंत सिरसाट.

नांदगाव / चिंचोली जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहलीतून ऐतिहासिक अन् प्रेक्षणीय स्थळांचा घेतला मनसोक्त आनंद.
एम.जे.न्यूज सातारा, (प्रतिनिधी ) वसंत सिरसाट
नांदेड.दि.28 :- लोहा तालुक्यातील नांदगाव / चिंचोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल पाच दिवसा करीता नुकतीच काढण्यात आली होती. त्यात त्यांनी ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या व या भेटीतून त्यांनी ऐतिहासिक स्थळांच्या माहितीसह प्रेक्षणीय स्थळांचा घेतला मनसोक्त आनंद.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदगाव / चिंचोली येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल नुकतीच पार पडली. ही सहल तुळजापूर, कोल्हापूर, कनेरी मठ, ज्योतिबा मंदिर, पन्हाळा गड, नानिज, गणपतीपुळे, महाबळेश्वर, महाड, जेजुरी व पंढरपूर आदी ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळाच्या ठिकाणी गेली होती. या सहलीतून विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक माहितीसह प्रेक्षणीय स्थळांचा मनसोक्त आनंद घेतला. या शैक्षणिक सहलीमध्ये दोन्ही शाळेतील इयत्ता 5 वी ते 9 वीच्या 92 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात 61 मुली व 31 मुले होती. एकंदरीत ही सहल खेळीमेळीचे वातावरणात व आनंदात संपन्न झाली.
या सहलीचे आयोजन नांदगाव शाळेचे मुख्याध्यापक एम.डी.सिरसाट, व चिंचोली शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर यांनी केले होते. व त्यांच्याच मार्गदर्शना खाली ही सहल काढण्यात आली होती.
यावेळी शाळेतील उपक्रमशील शिक्षक उत्तम बागल सर, नळे सर, हळेधोंगडे सर, मरकंटे सर, दिगंबर पाटील, श्रीमती महादाबाई हे सहलीमध्ये सहभागी झाले होते. तर या शैक्षणिक सहलीसाठी राज्य परिवहन महामंडळाचे चालक यादव सुक्रे व वाहक शिवाजी माचेवाड यांनी सहलीचा सर्व प्रवास सुखदायक केला. एकंदरीत ही सहल पाच दिवसा करिता आयोजित करण्यात आली होती.