फ्रेंडशिप डे चे औचित्य साधून जावली जोडी रन चे स्पोर्ट जॅकेट लॉचिंग
www.mjnewssatara.live

फ्रेंडशिप डे चे औचित्य साधून जावली जोडी रन चे स्पोर्ट जॅकेट लॉचिंग
मेढा.दि.३ :- जगातील एकमेव जोडी रन अर्थात आपली जावली जोडी रनचे हे सहावे वर्ष आहे . 9 नोव्हेंबर रोजी होणार आहे” एक धाव आरोग्यासाठी,जोडी रन कुटुंबासाठी ” या मंत्राने फ्रेंडशिप डे ला जावली जोडी रन चा पहिला इव्हेंट पार पडला .
पोलीस परेड ग्राऊंड सातारा येथे रविवारी सकाळी पावणे आठ ला खऱ्या अर्थाने टॉप गिअर जावली जोडी रन ने खरोखर टॉप गिअर टाकला आहे .जिल्ह्यातील धावपटूनी पोलीस परेड मैदान तुडुंब भरले होते
सहाव्या वर्षी तब्बल नव्वद बक्षिसे देणारी जावळी जोडी रन खरोखर जगात अव्वल ठरली आहे .जावली जोडी रन चे स्पोर्ट जॅकेट लॉचिंग करताना टॉप गिअर चे CO श्री. श्रीकांत पवार सर , श्री सौरभ पवार, सातारा हाफ मॅरेथॉन चे डॉ संदीप काटे, डॉक्टर अनिल पाटील, सचिन शेळके, रविंद्र माने, पंकज नागोटे, डाँ दिपक बनकर, डाँ दयानंद घाडगे, ऍडव्होकेट संग्राम , नितेश भोसले, उदय सर, हे उपस्थित होते जावळी जोडी रन यांचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ डिगे, जावली जोडी रन ची टीम सुधिर पवार,डाँ अविनाश व्हरांडे,मिलिंद हळवे, राहुल शिंदे, गौरव साळुंखे, नितिन कवलगे,सुनिल जाधव, आनंदा आमले,पुनम डिगे, अनिल माने सह सातारा जिल्ह्यातील धावपटू हजर होते अनेक धावपटूंनी ऑफलाईन रजिस्ट्रेशन करून नाव नोंदणी केली
टॉप गिअर जावली जोडी रन चे साक्षीदार व्हा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.