जावली करांच्या वतीने आ.शशिकांतजी शिंदे यांचा ४ ऑगस्ट रोजी भव्य नागरिक सत्कार
www.mjnewssatara.live

जावली करांच्या वतीने आ.शशिकांतजी शिंदे यांचा ४ ऑगस्ट रोजी भव्य नागरिक सत्कार
एम.जे.न्युज.सातारा.
मेढा/दि.२८.जावली तालुक्याचे सुपुत्र,सातारा जिल्ह्याचे माजी जलसंपदा मंत्री, माजी पालकमंत्री आ.शशिकांतजी शिंदे यांची नुकतीच महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -शरचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल तमाम जावलीकरांच्या वतीने त्यांच्या भव्य नागरिक सत्काराचे आयोजन सोमवार दि. ४ ऑगस्ट रोजी दु. १ वा.मेढा येथील कलश मंगल कार्यालया मध्ये करण्यात आले असल्याची माहिती पक्षाचे विधानसभा अध्यक्ष सुरेश पार्टे यांनी दिली.
भव्य नागरी सत्कार समारंभाच्या नियोजनाची बैठक नुकतीच कुडाळ येथे दत्त मंगल कार्यालय संपन्न झाली. यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंचायत समिती व जिल्हा परिषद गट व गण निहाय कमिट्या तयार करण्यात आल्या. याप्रसंगी नियोजन बैठकीसाठी जावली पंचायत समितीचे माजी सभापती मोहनराव शिंदे, बाजारसमितीचे उपसभापती हेमंत शिंदे, बाजार समितीचे संचालक बुवासाहेब पिसाळ, मयूर देशमुख,राम कदम(युवानेते ),राजू कदम, गोपाळ बेलोशे, रामदास पार्टे, तात्या पवार, समीर डांगे, रोहीत रोकडे, प्रमोद पवार, महिला विधान सभा अध्यक्षा रूपाली भिसे, कुडाळचे उपसरपंच सोमनाथ कदम, लक्ष्मण पवार,अमोल शिंदे, प्रविण गुजर, रामचंद्र शिंदे, बाळासाहेब खंडारे, भालचंद्र रांजणे, चंद्रकांत रांजणे, रामदास रांजणे, सुभाष गुजर, लालासाहेब चव्हाण, विनोद यादव, किसन गोळे, सुनील दिवडे, भिकू भोसले, भिकाजी सपकाळ, मनोज परामणे, रतन शेलार, अशोक सरकाळे, भिकाजी सपकाळ, बाळासाहेब म्हामुलकर, विठ्ठल पवार, विलास दुंदळे, प्रकाश कदम,वसंत धनावडे, विठ्ठल पवार, संतोष शेलार, इ. प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढील नियोजन आढावा बैठक मंगळवार दि. २९ /७् / २५ रोजी सकाळी १० वा. दत्त मंगल कार्यालय कुडाळ ( शेते रोड ) येथे आयोजीत केली असून सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी बहुसंख्येने उपस्थीत राहावे. असे आवाहन सत्कार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.