आंतरराष्ट्रीय सहकार वर्षा निमित्त मेढा येथे वृक्षलागवड, स्वच्छता अभियान संपन्न
www.mjnewssatara.live

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षा निमित्त मेढा येथे वृक्षलागवड, स्वच्छता अभियान संपन्न
सातारा ( सुनिल धनावडे ).दि.२:- जावळीची राजधानी मेढा येथे सहाय्य्क निबंधक कार्यालय जावळी, जिल्हा बँक विभागीय कार्यालय मेढा, तसेच गटसचिव संघटने तर्फे वृक्ष लागवड, स्वच्छता अभियान संपन्न झाले
पर्यावरणाचा समतोल राखणेसाठी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन जावळीचे सहायक निबंधक सुनिल जगताप साहेब यांनी काढले.वार्षिक सभेचं महत्व व ती कशी असावी याची माहिती प्रात्यक्षिक एन के पवार यांनी केले, नविन संगणक प्रणाली मधील ई ऑडीट बाबत माहिती विशाल भोसले यांनी दिली आंतरराष्ट्रीय सहकार वर्षा निमित्त कोण कोणते उपक्रम संस्थांना राबवता येतील यां विषयी सविस्तर माहिती अक्षय चव्हाण यांनी कार्यक्रमात सांगितली. 30 जुन रोजी ज्या संस्था बँक पातळीवर व सोसायटी पातळीवर 100% झाल्या आहेत त्या सचिवांना पुष्पगुच्छ देवून त्यांचा विभागीय विकास अधिकारी आर एल निकम यांनी सत्कार केला
मा सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे मार्फत आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्त १ जुलै २०२५ ते ६ जुलै २०२५ या कालावधीमध्ये विविध उपक्रम साजरे होत आहेत
संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरे करणेच्या अनुषंगाने सहकार विभागामार्फत वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांपैकी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी ५ जुलै २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. तसेच ६ जुलै २०२५ रोजी केंद्र शासनामध्ये स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापनेला चार वर्षे पूर्ण झाल्यामुळे ६ जुलै हा दिवस चौथा स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
त्याचे ओचित्य साधून जुलै महिन्यातील पहिल्या आठवड्यात राबविण्यात येणारे उपक्रमांमध्ये राज्यातील सहकारी संस्थांचे सर्व पदाधिकारी व अधिकारी सहभाग घेणार आहेत तसेच सदर कार्यक्रम अंतर्गत वृक्षलागवड, स्वच्छता अभियान यांसारखे विविध उपक्रम राबविणेत यावे असे आवाहन सहायक निबंधक कार्यालयाकडून करणोत आले
सदर कार्यक्रम प्रसंगी सहायक निबंधक सुनिल जगताप, विभागीय विकास अधिकारी आर एल निकम,एन बी पवार ,अक्षय चव्हाण,लेखापारीक्षक विशाल भोसले, विकास अधिकारी अरुण खटावकर, बापूसो धनावडे,गोपाळ बेलोशे, अनिल धनावडे, रामदास पार्ट, मनोज देशमाने, सुनिल धनावडे,गणेश वंजारी, संतोष यादव, दिपक महामुलकर ,नरेश भिलारे, अमोल सुतार, विजय यादव, मेघनाथ शिर्के, शंकर निकम, निलम सुतार तसेच जिल्हा बँकेचे अधिकारी,तसेच सचिव संघटनेचे सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते