शिवक्रांती हिंदवी सेनेतर्फे गरजू निराधार विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
www. mjnewssatara. live

शिवक्रांती हिंदवी सेनेतर्फे गरजू निराधार विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
कुसुंबी.३०.शिवक्रांती हिंदवी सेना महाराष्ट्र राज्य आयोजित *क्रांतिज्योती शिक्षण आधार मोहीम – वर्ष ११ वे* मोहीम २८, २९ जून रोजी संपन्न झाली. या मोहिमेतर्गत आसनी तळ, करंजे, सांगवी मुरा, चिकणवाडी, सह्याद्री नगर, गांजे, वाई, सातारा येथील ज्ञानोबाराय गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था करंडी, व कोपरखैरणे येथील एकूण 167 विध्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले. यामध्ये वह्या, पेन, पेन्सिल, कंपास, पाणी बॉटल, इ.साहित्य आणि मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. सदर मोहिमेत संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष श्री. स्वप्निल जयवंतराव धनावडे सर, उपाध्यक्ष – प्रविण कदम, सचिव – शशी चिकणे, खजिनदार – सुधीर कांबळे , अमोल खोपडे, रणजित चव्हाण, जगन्नाथ शिंदे, सुमित कांबळे, मुकुंद गायकवाड, सागर गायकवाड, आदित्य जाधव,इत्यादी मावळे उपस्थित होते.