जोमेगाव येथे मंडलाधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांना निरोप : तर नूतन ग्राम महसूल अधिकाऱ्याचे स्वागत…..
एम.जे.न्युज सातारा- प्रतिनिधी- वसंत सिरसाट

जोमेगाव येथे मंडलाधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांना निरोप : तर नूतन ग्राम महसूल अधिकाऱ्याचे स्वागत…..
एम.जे.न्युज सातारा- प्रतिनिधी- वसंत सिरसाट
नांदेड : दि. 29, लोहा तालुक्यातील जोमेगाव महसूल विभागातील कापसी मंडळाचे मंडलाधिकारी चंद्रशेखर सहारे व जोमेगावचे ग्राम महसूल अधिकारी संतोष अस्कुलकर या दोघांची बदली झाल्याच्या निमित्ताने ग्रामस्थांच्या वतीने येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या मैदानात त्यांचा शाल, श्रीफळ, व हार घालून सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला.
तर नूतन ग्राम महसूल अधिकारी स्वाती येडे व विठ्ठल ढेपे यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील नागोराव शिंदे, माजी सरपंच आदिनाथ शिंदे, कोंडिबा गव्हाणे, सुधाकर शिंदे, पंडित कापसे, पोलिस पाटील मारोती पांचाळ, मारोती शिंदे, मनोहर भुरे, बालाजी पाटील, हरी पांचाळ, चंद्रकात शिंदे, शिवा माळेगावे आदीसह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती