जावळी तालुका डिजिटल मिडीया संपादक, पत्रकार संघटनेतर्फे वृक्षारोपण संपन्न
www. mjnewssatara.live

जावळी तालुका डिजिटल मिडीया संपादक, पत्रकार संघटनेतर्फे वृक्षारोपण संपन्न
मेढा.दि.२२ : संत तुकाराम महाराज यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून वनाचे महत्त्व पटवून देताना म्हटलंच आहे की, “ वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, पक्षी ही सुस्वरे आळविती”
या त्यांच्या पंक्तीतून त्यांनी लोकांना निसर्गाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्यावर आपल्या प्रमाणेच इतर प्राणी देखील
राहतात तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन ही आजच्या घडीला काळाची गरज आहे असे प्रतिपादन अध्यक्ष सुनील आण्णा धनावडे यांनी केले.
एक पेड माँ के नाम, याप्रमाणे प्रत्येक मनुष्याने, पत्रकारानी स्वतःच्या आईच्या नावे एक तरी झाड लावले पाहीजे असे प्रतिपादन एम जे न्यूज चे संपादक जितीन वेदे यांनी सर्वांना आवाहन केले
जावली तालुक्यातील कुसुंबी, भणंग,करंजे तसेच केंजळ येथे डिजिटल मिडिया जावली यांच्या वतीने रस्त्या शेजारी मोकळ्या जागी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. जावली तालुका डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पदाधिकारी यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. मागील वर्षा प्रमाणे या वर्षी सुद्दा डिजीटल मिडीया संघटनेतर्फे वृक्षारोपण करण्यात आले अशी माहिती संघटनेचे सचिव शेखर जाधव यांनी दिली.सदर कार्यक्रमासाठी संघटनेचे अध्यक्ष सुनिल धनावडे, देवेंद्र साळूंखे , राहुल ननावरे हणमंतराव धनावडे, बजरंग चौधरी,जितीन वेंदे, संजय वांगडे,प्रसन्न पवार,संजय धनावडे, विश्वनाथ डिगे,ओंकार साखरे,सचिव चंद्रशेखर जाधव,सर्व सभासद,पदाधिकारी उपस्थीत होते
यावेळी उपस्थीताचे स्वागत हणमंतराव धनावडे यांनी केले,आभार संजय वांगडे यांनी मानले .