बासर येथील गोदावरी नदीपात्रात बुडून पाच युवकांचा मृत्यू – पाचही युवक हैदराबादचे
एम.जे.न्युज सातारा- प्रतिनिधी- वसंत सिरसाट

बासर येथील गोदावरी नदीपात्रात बुडून पाच युवकांचा मृत्यू – पाचही युवक हैदराबादचे
एम.जे.न्युज सातारा- प्रतिनिधी- वसंत सिरसाट
नांदेड : दि.15, तालुका धर्माबाद येथून जवळ असलेल्या तीर्थक्षेत्र बासर येथील सरस्वती देवीच्या दर्शनासाठी कुंटुबासोबत आलेल्या 5 भाविक युवकांचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि.15 जून 2025 रोज रविवारी दुपारी घडली. दरम्यान मयत 5 युवक हे हैदराबाद येथील रहिवाशी असल्याची माहिती आहे.
धर्माबाद येथून जवळच असलेल्या तिर्थक्षेत्र बासर येथे देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. त्यामुळे येथे नेहमी भाविकांची वर्दळ असते. हैदराबाद मधील चिंतल बाजार येथे राहणाऱ्या कुटुंबातील 18 भाविक बासर येथे देवीच्या दर्शनासाठी दि.15 जून रोजी सकाळी आले होते. दर्शनापूर्वी गोदावरी नदीत पवित्र स्नान करण्यासाठी हे सर्व गेले होते. परंतु त्यातील 5 युवकांना पाण्याचा अंदाज आला नसल्या मुळे ते पाण्यातील गाळात फसल्याने काही वेळातच या 5 युवकांचा बुडून मृत्यू झाला. हा प्रकार सोबतच्या नातेवाईक व नदीकाठी असलेल्या नागरिकांच्या नजरेस आल्याने त्या लोकांनी आरडाओरड करत धावपळ केली परंतू काहीही उपयोग झाला नाही. ही माहिती मिळताच येथील प्रशासनाचे पथक, जीव रक्षक दलाचे जवान पाण्यात उतरले. काही वेळाच्या शोधानंतर पथकाने राकेश (वय 17) विनोद (वय 18) अऋतिक (वय 18) मदन (वय 17) भरत (वय 18) असे या 5 युवकांचे मृतदेह नदीतून बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी मौसा तेलंगणा येथील रुग्णालयात पाठविले. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर या युवकांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत असल्याची माहिती आहे.
सदरील बुक्क हे हैदरावाद मधील दिलसुखनगर भागात चिंतल बाजार येथे येथील असून आपल्या कुंटुबिया सोबत ते बासर देवीच्या दर्शनासाठी आले होते, असे सांगण्यात आले.या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनाथळी तेलंगणा राज्यातील पोलिस अधिकारी दाखल झाले होते.