आशियाई मिक्स बॉक्सिंग स्पर्धेत सागर शेलार यांची नेपाळ मध्ये सुवर्ण पदकाला गवसणी.
एम.जे.न्युज.सातारा.संपादक. जितीन वेंदे

आशियाई मिक्स बॉक्सिंग स्पर्धेत सागर शेलार यांची नेपाळ मध्ये सुवर्ण पदकाला गवसणी.
एम.जे.न्युज.सातारा.संपादक. जितीन वेंदे
कस.दि.4.दि.३०मे ते ३१मे रोजी बुढानिलकंठा महानगर पालिका,काठमांडू,नेपाळ येथे झालेल्या आशियाई मिक्स बॉक्सिंग स्पर्धेत सातारा जिल्ह्याचे जावळी तालुक्यातील अंधारी गावचे सुपुत्र अनेक राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी,आंतरराष्ट्रीय खेळाडू *श्री.सागर धनाजी शेलार* यांनी आपल्या खेळाचे कौशल्य दाखवत अनेक मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना हरवून *सुवर्ण पदकाला* गवसणी घातली आहे.
या स्पर्धेमध्ये भारत,नेपाळ,बांग्लादेश, भूतान,चीन,इराण,श्रीलंका,अफगाणिस्तान,थायलंड,इराक व इतरही देशांतील साधारण ६५० च्या आसपास खेळाडूंनी सहभाग घेतला होता. बुढानीलकंठ महानगर पालिका व काठमांडू राष्ट्रीय खेलकुद परिषद नेपाळ सरकार यांच्या मान्यतेने या स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेसाठी मुख्य पाहुणे
*श्री.राकेश मस्कर सर(ग्रँड मास्टर)*(सचिव – वर्ल्ड मिक्स बॉक्सिंग फेडरेशन) *श्री.एम.एस.नाथा कुमार सर* अध्यक्ष – आशियाई मिक्स बॉक्सिंग फेडरेशन तथा राष्ट्रीय अध्यक्ष – श्रीलंका मिक्स बॉक्सिंग असो. *श्री.सुमन लामा सर* अध्यक्ष – आशियाई मिक्स बॉक्सिंग फेडरेशन तथा राष्ट्रीय अध्यक्ष – नेपाळ मिक्स बॉक्सिंग असो. यांच्या उपस्थित स्पर्धा पार पडली
*मा.ना.आदितीताई तटकरे (खासदार)*
(मंत्री – महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य) तथा
अध्यक्ष – भारतीय मिक्स बॉक्सिंग महासंघ यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय संघाचे नेतृत्व श्री.प्रशांत मोहिते सर (राष्ट्रीय खजिनदार – भारतीय मिक्स बॉक्सिंग महासंघ) यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाला सुवर्णपदक २५, रौप्यपदक १५,कांस्यपदक १३ अशी मिळून ६३पदके पटकावली.त्यामध्ये *श्री.सागर धनाजी शेलार* यांनी *६५kg वजनी गटात* खेळून भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करत सुवर्णपदक जिंकले. त्याच्या यशामध्ये पत्नी सह कुटुंबाचा मोलाचा वाटा आहे. मा.श्री.उदयनराजे भोसले महाराज साहेब
(खासदार) मा.श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब (मंत्री – सार्वजनिक बांधकाम महाराष्ट्र राज्य) व श्री.ज्ञानदेव रांजणे साहेब (समाजसेवक) यांच्या कडून तसेच अंधारी गावातील व भागातील सर्व ग्रामस्थांकडून अभिनंदन कौतुक होत आहे. श्री.सिताराम जाधव साहेब,श्री. राजेंद्र भगत साहेब, श्री.पांडुरंग भोसले साहेब, श्री.रमेश शेलार साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.