Uncategorized
समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलीस उपायुक्त पदी बदली.
तुषार दोषी साताऱ्याचे नवे पोलीस अधिक्षक.

समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलीस उपायुक्त पदी बदली.
तुषार दोषी साताऱ्याचे नवे पोलीस अधिक्षक.
एम. जे. न्युज. सातारा.जितीन वेंदे
सातारा. दि.22महाराष्ट्र राज्य सरकारकडून आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यां करण्यात आले आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख पदी तुषार दोषी यांची लोहमार्ग पुणे पोलीस अधीक्षक येथून सातारा जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.
राज्य सरकारने २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज काढले असून, साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलीस उपायुक्त पदी बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी तुषार दोषी यांना सातारा जिल्हा पोलीस प्रमुख पदी बदली देण्यात आली आहे. तात्काळ बदली ठिकाणी हजर होण्याचे आदेश राज्य सरकारच्या वतीने बजावण्यात आले आहेत.